Cleanliness Drive: ‘कचरा’ नाही, तर ‘कुबेरचा’ खजिना! भंगार विकून सरकारने जमा केले चांद्रयान-3 च्या बजेटपेक्षा जास्त पैसे

फक्त या वर्षीच्या 2 ते 31 ऑक्टोबर दरम्यान राबवलेल्या मोहिमेत 23.2 दशलक्ष चौरस फूट कार्यालयीन जागा साफ करण्यात आली आणि 2.9 दशलक्ष जुन्या कागदी फायली हटवण्यात आल्या.

Cleanliness Drive: ‘कचरा’ नाही, तर ‘कुबेरचा’ खजिना! भंगार विकून सरकारने जमा केले चांद्रयान-3 च्या बजेटपेक्षा जास्त पैसे

Cleanliness Drive: मोदी सरकारने 2021 मध्ये सुरू केलेल्या स्वच्छता मोहिमेपासून आतापर्यं भंगार विकून 4,100 कोटींचा महसूल जमा केला आहे. फक्त या वर्षीच्या 2 ते 31 ऑक्टोबर दरम्यान राबवलेल्या मोहिमेत 23.2 दशलक्ष चौरस फूट कार्यालयीन जागा साफ करण्यात आली आणि 2.9 दशलक्ष जुन्या कागदी फायली हटवण्यात आल्या. ही आतापर्यंतची सर्वात मोठी स्वच्छता मोहीम ठरली असून, 1.158 दशलक्ष कार्यालयांनी यात सहभाग घेतला.

मंत्रालयांचा व्यापक सहभाग

ही मोहीम प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभागाच्या (DAR&PG) देखरेखीखाली पार पडली. यात 84 मंत्रालये आणि विभाग, तसेच परदेशातील भारतीय दूतावासांनी सक्रिय सहभाग घेतला. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय, के. राम मोहन नायडू आणि डॉ. जितेंद्र सिंह यांनी संपूर्ण प्रक्रियेचे निरीक्षण केले.

हेही वाचा – ED ची मोठी कारवाई! बंदी घातलेल्या PFI ची 67 कोटींची मालमत्ता जप्त; काय आहे नेमकं प्रकरण?

दरम्यान, 2021 ते 2025 दरम्यान केंद्र सरकारने पाच प्रमुख स्वच्छता मोहिमा राबवल्या. या काळात 23.62 लाख कार्यालये सहभागी झाली. तसेच 928.84 लाख चौरस फूट जागा साफ करण्यात आली. याशिवाय, 166.95 लाख फायली नष्ट किंवा बंद करण्यात आल्या, आणि एकूण 4,097.24 कोटींचा महसूल भंगार विक्रीतून आला.

हेही वाचा – Rare Earth Elements: चीनला टक्कर देण्यासाठी भारताचे “रेअर अर्थ” मिशन; तब्बल 7300 कोटींची योजना!

मोदींचा ‘स्वच्छतेतून संपन्नतेकडे’ संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रालयांना अधिक सक्रियतेने सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. परिणामी, ‘कचरा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वस्तूंनीच आता देशाच्या महसूलात मोठी भर पाडली आहे. ही मोहीम ‘स्वच्छतेतून संपन्नतेकडे’ या संकल्पनेचे प्रतीक ठरत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number