Mohammed Shami: भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या दुहेरी संकटात सापडला आहे. एकीकडे टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी त्याचा संघर्ष सुरू असतानाच, दुसरीकडे भारतीय निवडणूक आयोगाने त्याला नोटीस बजावली आहे. या नोटिशीनुसार, शमीला येत्या 6 दिवसांच्या आत आयोगासमोर उपस्थित राहावे लागणार आहे.
नेमकं प्रकरण काय?
हे प्रकरण पश्चिम बंगालमधील मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावृत्ती (SIR) मोहिमेशी संबंधित आहे. गेल्यावर्षी 16 डिसेंबर रोजी ही मोहीम सुरू झाली होती. दक्षिण कोलकात्याच्या जाधवपूर परिसरातील कार्टजू नगर शाळेत सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांसमोर (AERO) शमी आणि त्याच्या भावाला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यावेळी शमी राजकोट येथे विजय हजारे ट्रॉफीमध्ये पश्चिम बंगालसाठी खेळत असल्याने तो हजर राहू शकला नव्हता. आता निवडणूक आयोगाने कडक पवित्रा घेत शमीला 11 जानेवारी पर्यंत हजर राहण्याची अंतिम संधी दिली आहे. यावेळी उपस्थित न राहिल्यास त्याच्यावर मोठी कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – Vijay Hazare Trophy: मोठी बातमी! मुंबई संघाच्या कर्णधारपदात अचानक बदल; आता 'या' खेळाडूकडे सोपवण्यात आली धुरा
क्रिकेट कारकिर्दीतही अस्थिरता
शमी सध्या विजय हजारे चषक स्पर्धेत चांगली कामगिरी करत असला तरी, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी त्याला भारतीय संघात स्थान दिलेले नाही. आगामी एकदिवसीय विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर संघातून डावलले गेल्यामुळे, शमीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द आता धोक्यात आल्याची चर्चा क्रीडा विश्वात रंगली आहे. निवडणूक आयोगाच्या या नोटिशीमुळे 11 जानेवारीला शमीला आपली सर्व कामे सोडून हजेरी लावावी लागणार आहे. आता तो या नोटिशीला कसा प्रतिसाद देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.