MSRTC Scam: ST च्या अधिकाऱ्यांकडूनच महामंडळाला चुना! ग्रॅज्युटी घोटाळ्यात 63 अधिकारी दोषी, प्राथमिक अहवालात धक्कादायक माहिती समोर

निवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युटी वेळेत न दिल्याने महामंडळाला गेल्या 2 वर्षांत तब्बल 2.5 कोटी रुपये केवळ व्याज म्हणून मोजावे लागले आहेत.

MSRTC Scam: ST च्या अधिकाऱ्यांकडूनच महामंडळाला चुना! ग्रॅज्युटी घोटाळ्यात 63 अधिकारी दोषी, प्राथमिक अहवालात धक्कादायक माहिती समोर

MSRTC Scam: एकीकडे आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी धडपडणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (ST) आता अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युटी वेळेत न दिल्याने महामंडळाला गेल्या 2 वर्षांत तब्बल 2.5 कोटी रुपये केवळ व्याज म्हणून मोजावे लागले आहेत. या गंभीर प्रकरणासाठी 63 बडे अधिकारी जबाबदार असल्याचा खळबळजनक आरोप 'महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस'ने केला आहे.

तांत्रिक कारणांमुळे निवृत्त कर्मचाऱ्यांची अडवणूक
नियमानुसार, कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत त्याची ग्रॅज्युटी मिळणे आवश्यक आहे. मात्र, महामंडळातील काही अधिकाऱ्यांनी तांत्रिक कारणांचा आधार घेत ही देयके रोखून धरली. यामुळे संतापलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. न्यायालयाच्या आदेशानंतर, 26 विभागांमधील 480 कर्मचाऱ्यांना मुद्दल रकमेसोबतच मोठे व्याज आणि चक्रवाढ व्याज द्यावे लागले. केवळ 2 वर्षांच्या कालावधीत अडीच कोटी रुपये व्याजापोटी खर्च झाले, जो महामंडळावर विनाकारण पडलेला भार आहे.

मार्गदर्शक तत्त्वांकडे दुर्लक्ष आणि भ्रष्टाचाराचा संशय
एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी या प्रकरणावर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. त्यांच्या मते, कर्मचाऱ्यांची उपस्थिती किंवा रोजंदारीच्या काळातील तांत्रिक मुद्द्यांचा चुकीचा अर्थ लावून ग्रॅज्युटी थांबवली जाते. 2010, 2014 आणि 2023 मध्ये स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी करूनही अधिकाऱ्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. काही प्रकरणांमध्ये अधिकारी आणि संबंधितांचे संगनमत असल्याने ही प्रकरणे न्यायालयात वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवली जातात, असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा – MSRTC New Campaign: ST चा होणार कायापालट! 1 मे पासून 'आपली बस, आपली सेवा' अभियान सुरू; प्रवाशांना काय होणार फायदा ?

8 कोटींची रक्कम अद्यापही प्रलंबित; वसुलीची मागणी
धक्कादायक बाब म्हणजे, व्याजापोटी 2.5 कोटी रुपये गमावल्यानंतरही महामंडळ प्रशासनाला जाग आलेली नाही. गेल्या 2 वर्षांत सुमारे 8 कोटी रुपयांची ग्रॅज्युटी रक्कम अद्यापही विविध कारणांनी अडकून पडली आहे. यामुळे भविष्यात व्याजाचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. "ज्या 63 अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एसटीचे कोट्यवधींचे नुकसान झाले, त्यांच्या पगारातून ही व्याजाची रक्कम वसूल करावी आणि त्यांच्यावर कडक कारवाई करावी," अशी मागणी श्रीरंग बरगे यांनी प्रशासनाकडे केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number