Thane News: चिंता मिटली! ठाणेकरांची तहान भागवणारे बारवी धरण 100 टक्के भरले; पाण्याचा विसर्ग सुरू

धऱणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे बारवी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Thane News: चिंता मिटली! ठाणेकरांची तहान भागवणारे बारवी धरण 100 टक्के भरले; पाण्याचा विसर्ग सुरू

Thane Barvi Dam Overflow: गेल्या काही दिवसांत पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी, बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा जोरदार अतिवृष्टी झाली आहे. आतापर्यंत धरण क्षेत्रात तब्बल 2002 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा 100 टक्क्यांवर पोहोचला असून धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. पाण्याचा वाढता साठा पाहता आज पहाटे 4 वाजता धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले असून, त्यातून सध्या सुमारे 2500 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग थेट नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.

ठाणे, कल्याणसह 5 मोठ्या शहरांना मोठा दिलासा
बदलापूरजवळील बारवी धरण हे ठाणे जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा पाण्याचा मुख्य स्त्रोत मानले जाते. या धरणातून ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि मीरा-भाईंदर यांसारख्या प्रमुख शहरांसह परिसरातील मोठ्या औद्योगिक क्षेत्रांना आणि ग्रामीण भागांना नियमित पाणीपुरवठा केला जातो. धरण काठोकाठ भरल्यामुळे या सर्व भागांतील नागरिकांसह एमआयडीसी (MIDC) क्षेत्रातील उद्योगांची आगामी वर्षातील पाणीटंचाईची भीती आता पूर्णपणे दूर झाली आहे.

हेही वाचा – Central Railway: पश्चिम रेल्वेपाठोपाठ मध्य रेल्वेची वाहतूकही खोळंबली! मुलुंड स्थानकात ओव्हरहेड वायरवर कोसळले साहित्य, धुराचे लोट अन्…

प्रशासनाकडून बारवी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
धरणाचे 11 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे बारवी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरक्षेचा उपाय म्हणून नदीकाठच्या सर्व गावांना आणि रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीपात्राजवळ जाणे, पोहणे किंवा पाळीव प्राण्यांना नेणे टाळावे, तसेच स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सर्व आपत्कालीन सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

हेही वाचा – BMC Corporators: महापालिकेचा कारभार होणार पेपरलेस; 237 नगरसेवकांना महिनाभरात मिळणार Apple टॅब

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number