Thane-Borivali Twin Tunnels: 90 मिनिटांचा प्रवास फक्त 15 मिनिटांत! ठाणे-बोरिवली दरम्यान देशातील सर्वात लांब शहरी बोगदा

हा दुहेरी मार्ग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणार असून पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.

Thane-Borivali Twin Tunnels: 90 मिनिटांचा प्रवास फक्त 15 मिनिटांत! ठाणे-बोरिवली दरम्यान देशातील सर्वात लांब शहरी बोगदा

Mumbai Twin Tunnels : घोडबंदर रोडवर तासनतास वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ठाणे आणि बोरिवली दरम्यान बांधण्यात येणारा दुहेरी भुयारी बोगदा हा देशातील सर्वात लांब शहरी बोगदा ठरणार आहे. सध्या या 23 किमीच्या अंतरासाठी प्रवाशांना साधारणपणे 60 ते 90 मिनिटे लागतात, मात्र या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे हा प्रवास अवघ्या 15 मिनिटांवर येणार आहे. मुंबई आणि ठाणे या दोन शहरांमधील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी हा प्रकल्प गेमचेंजर ठरेल.

प्रकल्पाचे स्वरूप आणि कालमर्यादा
हा दुहेरी मार्ग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणार असून पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. एकूण 11.84 किमी लांबीच्या या मार्गापैकी 10.25 किमीचा भाग हा प्रत्यक्ष बोगद्याचा असेल. या प्रकल्पाचे काम 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचे काम मार्च 2023 मध्ये सुरू झाले असून, त्याला समांतर असा हा ठाणे-बोरिवली प्रकल्प मे 2028 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

‘नायक’ आणि ‘अर्जुन’ यंत्रांचा पराक्रम
बोगद्याच्या खोदकामासाठी अत्यंत प्रगत अशा टनेल बोरिंग मशीनचा (TBM) वापर केला जाणार आहे. ‘नायक’ नावाचे मशीन या कामासाठी सज्ज झाले असून, हे देशातील एकमेव ‘सिंगल शिल्ड हार्ड रॉक’ टीबीएम आहे. ‘नायक’च्या मदतीने कठीण खडकांचे खोदकाम सुरू होईल आणि त्यानंतर ‘अर्जुन’ हे मशीन देखील या कामात सामील होणार आहे. या आधुनिक यंत्रसामग्रीमुळे राष्ट्रीय उद्यानातील वनक्षेत्राला कोणतीही इजा न पोहोचवता जमिनीखाली सुरक्षित खोदकाम करणे शक्य होणार आहे.

हेही वाचा – Nitesh Rane: ‘मुंब्य्राचं नाव बदलून मुंब्रादेवी करणार’; जाहीर सभेत नितेश राणेंचा थेट इशारा

सुरक्षेसाठी अत्याधुनिक यंत्रणा
प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून या दुहेरी बोगद्यामध्ये प्रत्येकी 3 लेन तयार केल्या जाणार आहेत, ज्यामध्ये एका आपत्कालीन लेनचाही समावेश असेल. बोगद्याच्या आत कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी दर 300 मीटरवर ‘क्रॉस पॅसेज’ची सोय असेल. याशिवाय, बोगद्यामध्ये स्मोक डिटेक्टर्स, अत्याधुनिक अग्निशमन उपकरणे आणि प्रवाशांना सूचना देण्यासाठी डिजिटल एलईडी माहिती फलक बसवण्यात येणार आहेत. यामुळे प्रवासादरम्यान सुरक्षेची पूर्ण खात्री दिली जाईल.

कनेक्टिव्हिटीमध्ये मोठी क्रांती
हा प्रकल्प केवळ वेळच वाचवणार नाही, तर पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा एक भक्कम दुवा ठरेल. ठाण्यातील घोडबंदर रोड थेट वेस्टर्न एक्सप्रेस हायवेशी जोडला गेल्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल. सध्या वाहतूक कोंडीमुळे वाया जाणारे इंधन आणि वेळ या प्रकल्पामुळे वाचणार असून, ठाणे आणि बोरिवलीकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि वेगवान होणार आहे.

हेही वाचा – Manas Patil: सहा वर्षांच्या जलतरणपटूचा अरबी समुद्रात विश्वविक्रम; नागाव-जेएनपीटी 17 किलोमीटरचे अंतर पोहून केलं पार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number