Thalapathy Vijay Divorce: थलापती विजयचा 27 वर्षांचा संसार मोडला; पत्नी संगीताने न्यायालयात दाखल केला घटस्फोटाचा अर्ज

विजय आणि त्यांची पत्नी संगीता सोर्नालिंगम यांनी लग्नाच्या 27 वर्षांनंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

Thalapathy Vijay Divorce: थलापती विजयचा 27 वर्षांचा संसार मोडला; पत्नी संगीताने न्यायालयात दाखल केला घटस्फोटाचा अर्ज

Thalapathy Vijay Divorce: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आणि 'तमिळगा वेत्री कझगम' पक्षाचे संस्थापक थलापती विजय यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. विजय आणि त्यांची पत्नी संगीता सोर्नालिंगम यांनी लग्नाच्या 27 वर्षांनंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. संगीता यांनी 27 फेब्रुवारी 2026 रोजी चेंगलपट्टू येथील कौटुंबिक न्यायालयात अधिकृतपणे घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.

27 वर्षांच्या सहप्रवासाचा अंत
थलापती विजय आणि संगीता यांचा विवाह 25 ऑगस्ट 1999 रोजी झाला होता. विजय ख्रिश्चन धर्मीय असून संगीता हिंदू आहेत, त्यामुळे हा विवाह हिंदू रितीरिवाजांनुसार पार पडला होता. चेन्नईमध्ये झालेल्या या विवाह सोहळ्याला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र, गेल्या काही काळापासून त्यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा रंगत होत्या. आता घटस्फोटाच्या याचिकेमुळे या चर्चांवर शिक्कामोर्तब झाले असून, हे या जोडप्याच्या विभक्त होण्याच्या दिशेने पडलेले पहिले कायदेशीर पाऊल मानले जात आहे.

चकाचक जगापासून दूर राहिली संगीता
संगीता सोर्नालिंगम या मूळच्या श्रीलंकेतील तमिळ कुटुंबातील आहेत, मात्र त्यांचे शिक्षण आणि बालपण युनायटेड किंगडममध्ये गेले. सुपरस्टारची पत्नी असूनही संगीता यांनी नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात राहणे टाळले. त्या सार्वजनिक कार्यक्रमात किंवा सोशल मीडियावर क्वचितच दिसत असत. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कुटुंब आणि मुलांच्या संगोपनाला समर्पित केले होते.

जेसन संजय आणि दिव्या साशा: मुलांचे भविष्य काय?
विजय आणि संगीता यांना दोन मुले आहेत. 26 ऑगस्ट 2000 रोजी त्यांचा मुलगा जेसन संजय याचा जन्म झाला, तर 2005 मध्ये त्यांना दिव्या साशा ही मुलगी झाली. जेसन संजय याने आधीच तमिळ चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले असून तो स्वतःची ओळख निर्माण करत आहे. आई-वडिलांच्या घटस्फोटाच्या निर्णयाचा मुलांवर काय परिणाम होईल, याबाबत चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – Bigg Boss Marathi 6 Rakhi Sawant : राकेशने केलं तन्वीला किस, राखी चवताळली; स्वत:ला दिली एवढी मोठी शिक्षा की, संपूर्ण घर हादरले

राजकीय कारकिर्दीच्या उंबरठ्यावर मोठा निर्णय
विजय यांनी नुकताच स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करून पूर्णवेळ राजकारणात उतरण्याची घोषणा केली आहे. अशा महत्त्वाच्या वळणावर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील या घडामोडीने तमिळनाडूमध्ये खळबळ उडाली आहे. सुपरस्टार विजय यांनी अद्याप या घटस्फोटावर कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. सध्या न्यायालयात या याचिकेवर सुनावणी सुरू असून, पुढील कायदेशीर प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number