Horrific Rent Dispute Case : संतापजनक! घरभाड्यासाठी दोन हजार रुपये नव्हते; नराधमाने घरमालकासोबत केला पत्नी आणि मुलीच्या अब्रूचा सौदा

हे पीडित कुटुंब सुमारे 6 महिन्यांपूर्वीच कामाच्या शोधात गुजरातमधील मोरबी येथे स्थलांतरित झाले होते. तिथे त्यांनी महिन्याला 2000 रुपये भाडे देण्याच्या अटीवर एक घर भाड्याने घेतले. यानंतर...

Horrific Rent Dispute Case : संतापजनक! घरभाड्यासाठी दोन हजार रुपये नव्हते; नराधमाने घरमालकासोबत केला पत्नी आणि मुलीच्या अब्रूचा सौदा

Horrific Rent Dispute Case : माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. अवघे 2000 रुपयांचे घरभाडे थकल्यामुळे एका नराधम व्यक्तीने चक्क आपल्या पत्नीला आणि अल्पवयीन मुलीला घरमालकाच्या हवाली केले. व्यवसाय नीट चालत नसल्याने या कुटुंबाचे भाडे थकले होते. याचा गैरफायदा घेत घरमालकाने पैशांसाठी तगादा लावला. अखेर या नराधम पतीने घरमालकाला आपल्याच कुटुंबावर अत्याचार करण्याची परवानगी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, एका राष्ट्रीय पातळीवरील वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.

6 महिन्यांपूर्वी रोजगारासाठी आलेले कुटुंब नराधमांच्या जाळ्यात
हे पीडित कुटुंब सुमारे 6 महिन्यांपूर्वीच कामाच्या शोधात गुजरातमधील मोरबी येथे स्थलांतरित झाले होते. तिथे त्यांनी महिन्याला 2000 रुपये भाडे देण्याच्या अटीवर एक घर भाड्याने घेतले. परंतु, पतीच्या व्यवसायात यश न मिळाल्यामुळे थकीत भाड्याची रक्कम वाढत गेली. या हतबलतेचा गैरफायदा घेत आरोपी घरमालकाने तक्रारदार व्यक्तीच्या मुलीवर आणि नातीवर स्वतःच्या घरात, भाड्याच्या खोलीत तसेच टंकारा या ठिकाणी वारंवार लैंगिक अत्याचार केले. संतापजनक बाब म्हणजे, ज्यावेळी हा छळ सुरू झाला तेव्हा
नराधम बापाची ती मुलगी अवघ्या 13 वर्षे 7 महिन्यांची होती. या नराधम घरमालकाच्या एका नातेवाईकानेही माय-लेकीवर लैंगिक अत्याचार केल्याचे तपासात उघड झाले आहे.

हेही वाचा – Amravati Crime: अमरावती हादरली! 50 वर्षीय गतिमंद महिलेवर 25 वर्षीय नराधमाचा अत्याचार; आईने आरोपीला रंगेहाथ पकडलं अन्…

पीडितेच्या आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक सत्य उजेडात
1 मे रोजी जेव्हा पीडितेच्या आईने मोरबी सिटी 'ए' डिव्हिजन पोलीस ठाण्यात धाव घेत आपल्या जावयाविरुद्ध (भाडेकरू), 55 वर्षीय घरमालकाविरुद्ध आणि त्याच्या नातेवाईकांविरुद्ध रीतसर तक्रार दाखल केली, तेव्हा हा संपूर्ण घृणास्पद प्रकार उजेडात आला. तक्रार मिळताच पोलिसांनी वेगाने हालचाली करत नराधम पती आणि 55 वर्षांच्या मुख्य आरोपी घरमालकाला तात्काळ अटक केली. या दोघांनाही न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची रवानगी तुरुंगात केली आहे.

पोलीस तपास सुरू; सहआरोपी अद्याप फरार
मोरबी शहर 'ए' विभागाचे पोलीस निरीक्षक वाय. बी. जडेजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी आणि पीडितेच्या पतीला आधीच तुरुंगात पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा रीतसर पंचनामा केला असून पीडित माय-लेकीची तसेच आरोपींची वैद्यकीय तपासणी पूर्ण केली आहे. गुन्ह्याशी संबंधित काही वैज्ञानिक पुरावेही हस्तगत करण्यात आले आहेत. मात्र, या घृणास्पद गुन्ह्यात मदत करणारा घरमालकाचा नातेवाईक आणि त्याचे कुटुंबीय सध्या फरार असून, पोलीस पथके त्यांचा कसून शोध घेत आहेत.

हेही वाचा – Paratwada Case: मुलींना जाळ्यात ओढणाऱ्या अयानचं आणखी एक काळं कृत्य उघड; आईचे दागिने चोरले अन्…

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number