BCCI Launch Team India’s Jersey: टी20 विश्वचषक 2026 साठी टीम इंडियाची नवी जर्सी लाँच करण्यात आली असून तिचा पहिलाच फोटो समोर आला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने हा विश्वचषक पुढील वर्षी 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वीच आयसीसीने स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाच्या डावानंतर बीसीसीआयने गतविजेत्या भारताची टी20 विश्वचषक 2026 साठीची अधिकृत जर्सी प्रदर्शित केली. या जर्सीच्या कॉलरवर तिरंगा आणि समोर गडद निळ्या व हलक्या निळ्या रंगांच्या पट्ट्यांची रचना विशेष लक्ष वेधून घेते. जर्सीच्या बॉर्डरला नारंगी रंग देण्यात आला आहे.
हेही वाचा – IND-SA T20 Squad: हार्दिक पंड्याचे टी-20 संघात पुनरागमन; गिल फिटनेसनुसार खेळणार
जर्सीवरील दोन तारे ठळक आकर्षण
या जर्सीवर दोन तारे छापण्यात आले आहेत, जे भारताच्या दोन टी20 विश्वचषक विजयांचे प्रतीक आहेत. भारताने पहिले विजेतेपद 2007 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली मिळवले होते, तर दुसरा किताब 2024 साली रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पटकावला. जर्सीचे अनावरण करताना कर्णधार रोहित शर्मा आणि तिलक वर्मा उपस्थित होते.
Rohit Sharma unveils the jersey for T20 World Cup 2026 ?? ? BCCI#indvssa #viratkohli #rohitsharma #shubmangill #bharatarmy #COTI ?? #rishabhpant #jaspritbumrah #dhoni pic.twitter.com/4ysKSf0iDF — The Bharat Army (@thebharatarmy) December 3, 2025
हेही वाचा – Virat Kohli Century : कोहलीची विराट कामगिरी! दोन वर्षांनंतर बॅक टू बॅक 2 ODI सेंच्युरी
टीम इंडियाची मोहिम 7 फेब्रुवारीपासून सुरू
टीम इंडिया टी20 विश्वचषक 2026 चा पहिला सामना 7 फेब्रुवारी रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू करेल. त्यानंतरचे त्यानंतर, टीम इंडिया 12 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर नामिबियाविरुद्ध आपला पुढचा सामना खेळेल. भारतीय संघ 15 फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध ग्रुप अ मधील तिसरा सामना खेळेल. टीम इंडिया 18 फेब्रुवारी रोजी अहमदाबादच्या स्टेडियमवर नेदरलँड्सविरुद्ध शेवटचा ग्रुप स्टेज सामना खेळेल. टीम इंडियाचे सर्व ग्रुप स्टेज सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होतील. दरम्यान, भारताच्या नवनव्या जर्सीचे डिझाइन, त्यावरील तिरंगा आणि दोन विश्वविजेतेपदांचे प्रतीक असलेले तारे पाहून चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.