Tata Hydroelectric Project in Bhutan : भारताची ‘टाटा पॉवर’ कंपनी भूतानमध्ये उभारणार 1125 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प

टाटा पॉवर भुतानमधील एका जलविद्युत प्रकल्पात भागीदार होणार आहे. ड्रक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (DGPC) आणि टाटा पॉवर यांच्यात हा करार झाला आहे.

Tata Hydroelectric Project in Bhutan : भारताची ‘टाटा पॉवर’ कंपनी भूतानमध्ये उभारणार 1125 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प

Tata Hydroelectric Project in Bhutan : देशातील ऊर्जा (Energy) क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या टाटा पॉवरने (Tata Power) भुतानमध्ये एक मोठा जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी सामंजस्य करार (Memorandum of Understanding – MoU) केला आहे. भुतानमधील ड्रक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (DGPC) आणि टाटा पॉवर यांच्यात हा करार झाला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची क्षमता 1125 मेगावॅट इतकी असेल, त्याचे नाव दोर्जेलुंग जलविद्युत प्रकल्प (Dorjilung Hydroelectric Project) आहे.
प्रकल्पाची रचना आणि गुंतवणूक
हा प्रकल्प 'स्पेशल पर्पज व्हेईकल' (SPV) द्वारे राबविला जाणार आहे. यामध्ये 'डीजीपीसी'ची 60% टक्के तर 'टाटा पॉवर'ची 40% टक्के भागीदारी असणार आहे. अंदाजे 13,100 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प मोंगर (Mongar) येथे कुरिछू नदीवर (Kurichhu River) उभारण्यात येईल. हा प्रकल्प भूतानमधील क्रमांक दोनचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प असून, सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून (Public-Private Partnership – PPP) देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रकल्प ठरणार आहे. या प्रकल्पात प्रत्येकी 187.5 मेगावॅट क्षमतेचे 6 संच बसविण्यात येणार आहेत. टाटा पॉवर या प्रकल्पात सुमारे 1572 कोटींची गुंतवणूक करणार असून, प्रकल्पाच्या प्रगतीनुसार ही रक्कम दिली जाईल.

हेही वाचा – Ayushman Bharat: आयुष्मान भारत योजनेमध्ये मोठा बदल! आता मिळणार तब्बल 10 लाखांचे मोफत उपचार कव्हर

करार आणि ऊर्जेचा पुरवठा
हा सवलत करार भुतानची राजधानी थिंफू(Thimphu) येथे करण्यात आला. यावेळी 'टाटा पॉवर'चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रवीर सिन्हा; 'ड्रक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन'चे व्यवस्थापकीय संचालक दाशो छेवांग रिन्झिन; आणि भुतान सरकारच्या ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधन मंत्रालयाचे (Ministry of Energy and Natural Resources) महासंचालक कर्मा पी. दोरजी यांनी स्वाक्षरी केली. हा प्रकल्प सप्टेंबर 2031 मध्ये कार्यान्वित (Operational) होण्याची अपेक्षा आहे आणि प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या एकूण विजेपैकी 80% टक्के वीज भारताला पुरवली जाणार आहे.

उच्चस्तरीय उपस्थिती
या कराराच्या वेळी भुतानचे पंतप्रधान लियोंचेन त्शेरिंग तोबगे आणि ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधन मंत्रालयाचे सचिव दाशो कर्मा त्शेरिंग; 'ड्रक होल्डिंग इन्व्हेस्टमेंट्स'च्या अध्यक्षा दाशो कर्मा वाय. रेडी; 'टाटा पॉवर'च्या जनरेशन बिझनेसच्या अध्यक्षा अंजली पांडे यांची उपस्थिती होती. याव्यतिरिक्त, भुतानमधील भारतीय दूतावास आणि जागतिक बँकेचे (World Bank) वरिष्ठ अधिकारी देखील या सोहळ्याला उपस्थित होते.

हेही वाचा – India-US Trade: टॅरिफ वॉरमध्ये भारताचा मास्टरस्ट्रोक! अमेरिकेला मोठा झटका, चीनसोबतचे संबंध नव्या टप्प्यात

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number