Corruption Case: कोर्टाची कठोर कारवाई! चीनच्या माजी कृषीमंत्र्याला भ्रष्टाचार प्रकरणात सुनावली फाशीची शिक्षा

न्यायालयाच्या आदेशानुसार, तांग यांचे सर्व राजकीय अधिकार कायमस्वरूपी काढून घेण्यात आले असून त्यांची सर्व मालमत्ता जप्त केली जाणार आहे.

Corruption Case: कोर्टाची कठोर कारवाई! चीनच्या माजी कृषीमंत्र्याला भ्रष्टाचार प्रकरणात सुनावली फाशीची शिक्षा

Corruption Case: चीनचे माजी कृषी आणि ग्रामीण व्यवहार मंत्री तांग रेंजियान यांना 38 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची लाच घेतल्याबद्दल मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तथापि, त्यांना ही शिक्षा तात्काळ न देत दोन वर्षांच्या मुदतीसह जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली आहे. ईशान्य चीनमधील जिलिन प्रांतातील चांगचुन इंटरमीडिएट पीपल्स कोर्टाने हा निकाल दिला. न्यायालयाच्या आदेशानुसार, तांग यांचे सर्व राजकीय अधिकार कायमस्वरूपी काढून घेण्यात आले असून त्यांची सर्व मालमत्ता जप्त केली जाणार आहे. तसेच, लाचखोरीतून मिळवलेला बेकायदेशीर नफा सरकारच्या तिजोरीत जमा केला जाईल.

हेही वाचा – Canada PM Mark Karni : अमेरिकेच्या H-1B व्हिसाची किंमत वाढल्यानंतर कॅनडाच्या पंतप्रधानांची मोठी घोषणा; म्हणाले, '…आम्ही त्यांचे स्वागत करणार'

38 दशलक्ष डॉलर्सचा घोटाळा

अधिकृत शिन्हुआ वृत्तसंस्थेनुसार, 2007 ते 2024 या कालावधीत तांग यांनी विविध पदांचा गैरफायदा घेत 268 दशलक्ष युआन (सुमारे 38 दशलक्ष डॉलर्स) किमतीची लाच स्वीकारली. न्यायालयीन सुनावणीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि पश्चात्ताप व्यक्त केला. मात्र, न्यायालयाने त्यांच्या अपराधाला गंभीर मानत मृत्युदंडाची शिक्षा योग्य ठरवली.

हेही वाचा – Most Powerful Fighter Jet: जगातील सर्वात ताकदवर लढाऊ विमान कोणते? जाणून घ्या थक्क करणारी तंत्रज्ञानाची रहस्ये

शी जिनपिंग यांची भ्रष्टाचारविरोधी मोहीम

दरम्यान, 2012 मध्ये सत्तेवर आल्यानंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी भ्रष्टाचारविरोधी मोठी मोहीम सुरू केली होती. या मोहिमेत आतापर्यंत दहा लाखांहून अधिक सरकारी अधिकारी, अनेक वरिष्ठ प्रशासकीय आणि लष्करी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. तांग रेंजियान यांना सुनावण्यात आलेली शिक्षा ही चीनमधील उच्च पातळीवरील भ्रष्टाचार प्रकरणांवरील कठोर भूमिकेचे आणखी एक उदाहरण मानले जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number