Swiggy Food Delivery : स्विगीचा मोठा निर्णय; 10 मिनिटांत फूड डिलिव्हरी होणार बंद, कारण समोर

स्विगीचा निव्वळ तोटा ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 या तिसऱ्या तिमाहीत 33 टक्क्यांनी वाढून 1,065 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील वर्षी याच काळात 799 कोटी रुपये होता.

Swiggy Food Delivery : स्विगीचा मोठा निर्णय; 10 मिनिटांत फूड डिलिव्हरी होणार बंद, कारण समोर

Quick Commerce: प्रसिद्ध फूड टेक कंपनी स्विगीने (Swiggy) आपले 10 मिनिटांत अन्न पोहोचवणारे 'स्नॅक' (Snacc) हे ॲप बंद करण्याची घोषणा केली आहे. सुमारे एक वर्षापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या या सेवेला व्यवसायात नफा मिळवण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. कंपनीने 19 फेब्रुवारी रोजी एका अंतर्गत ईमेलद्वारे आपल्या कर्मचाऱ्यांना या निर्णयाची माहिती दिली आहे.

नफा मिळवण्यात अपयश आणि वाढता तोटा
स्विगीने जानेवारी 2025 मध्ये 'स्नॅक' लाँच केले होते, ज्याचा उद्देश ग्राहकांना 10 ते 15 मिनिटांत नाश्ता, कॉफी आणि बेकरी उत्पादने उपलब्ध करून देणे हा होता. मात्र, हे मॉडेल आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत नव्हते. स्विगीचा निव्वळ तोटा ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 या तिसऱ्या तिमाहीत 33 टक्क्यांनी वाढून 1,065 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील वर्षी याच काळात 799 कोटी रुपये होता. या वाढत्या तोट्यामुळे कंपनीने न परवडणारे प्रकल्प बंद करण्यावर भर दिला आहे.

स्पर्धक कंपन्यांनाही बसला फटका
केवळ स्विगीच नाही, तर या क्षेत्रातील इतर कंपन्यांनाही 10 मिनिटांच्या डिलिव्हरी मॉडेलमध्ये नुकसानीचा सामना करावा लागत आहे. अहवालानुसार, स्विगीची स्पर्धक कंपनी 'ब्लिंकइट'च्या (Blinkit) 'बिस्ट्रो' या सेवेला नऊ महिन्यांत अंदाजे 150 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. यामुळेच झेप्टो कॅफे (Zepto Cafe) सारख्या सेवांसमोरही आता मोठे आव्हान उभे राहिले आहे.

हेही वाचा – Google Play Store App Ban: गुगलचा 'सर्जिकल स्ट्राईक'; प्ले स्टोअरवरील 17.5 लाख ॲप्सवर बंदी

गिग कामगारांची सुरक्षा आणि सरकारचे निर्देश
दरम्यान, 10 मिनिटांच्या डिलिव्हरी मॉडेलवर केंद्र सरकारनेही आक्षेप घेतला होता. वेगाने डिलिव्हरी करण्याच्या नादात डिलिव्हरी पार्टनर्सच्या (गिग कामगार) जिवाला धोका निर्माण होत असल्याची चिंता सरकारने व्यक्त केली होती. 31 डिसेंबर रोजी गिग वर्कर्स युनियनने पुकारलेल्या संपानंतर, सरकारने कंपन्यांना 10 मिनिटांची कठोर मुदत काढून टाकण्याचे निर्देश दिले होते. या वाढत्या दबावामुळे आणि सुरक्षेच्या कारणास्तव स्विगीने हे पाऊल उचलले आहे.

कर्मचाऱ्यांचे पुनर्वसन आणि भविष्यातील योजना
'स्नॅक' ही सेवा प्रामुख्याने बंगळुरू आणि गुरुग्राममध्ये मर्यादित होती. या निर्णयामुळे प्रभावित झालेल्या कर्मचाऱ्यांना कामावरून न काढता, पुढील 48 तासांत स्विगीच्या इतर विभागांमध्ये सामावून घेतले जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. कंपनी आता आपल्या मुख्य फूड डिलिव्हरी आणि 'इन्स्टामार्ट' या सेवांवर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number