Namkarn Aware Arrest: खरात प्रकरणाचा सस्पेन्स वाढला; रुपाली चाकणकरांच्या चौकशीनंतर नामकर्ण आवारेंना बेड्या

रुपाली चाकणकर यांची सहा तास चौकशी केल्यानंतर, आता आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात शिवनिका संस्थानचे माजी सचिव नामकर्ण आवारे यांना सिन्नर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.<br/>

Namkarn Aware Arrest: खरात प्रकरणाचा सस्पेन्स वाढला; रुपाली चाकणकरांच्या चौकशीनंतर नामकर्ण आवारेंना बेड्या

Namkarn Aware Arrest: अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणात एसआयटी (SIT) आणि सिन्नर पोलिसांनी तपासाचा फास अधिक आवळला आहे. महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची सहा तास चौकशी केल्यानंतर, आता आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात शिवनिका संस्थानचे माजी सचिव नामकर्ण आवारे यांना सिन्नर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

आर्थिक गैरव्यवहाराचा पर्दाफाश
अशोक खरातने सिन्नर येथील जगदंबा माता पतसंस्थेत तब्बल 32 बनावट खाती उघडल्याचे तपासात समोर आले आहे. या खात्यांच्या व्यवहारांना आवारे यांची मूकसंमती आणि सहकार्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. खरातने चौकशीदरम्यान दिलेल्या कबुलीनंतर पोलिसांनी तातडीने आवारे यांच्या अटकेची कारवाई केली. नामकर्ण आवारे हे सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीचे (STICE) चेअरमन आणि जगदंबा माता पतसंस्थेचे संस्थापक आहेत.

पुस्तकातील स्तुती पडली महागात
विशेष म्हणजे, नामकर्ण आवारे यांनी आपल्या 'असा मी नामकर्ण' या पुस्तकात अशोक खरातचे कौतुक करणारे एक स्वतंत्र प्रकरण लिहिले होते. तेव्हापासूनच आवारे आणि खरात यांचे जवळचे संबंध चर्चेत आले होते. आता थेट गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने आवारे पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.

हेही वाचा – Thane Crime : ठाणे महापालिकेत खळबळ! महिला डॉक्टरने 6 व्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन

भोंदू खरातला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी
बनावट खात्यांमार्फत होणाऱ्या आर्थिक व्यवहारांचे मूळ शोधण्यासाठी पोलिसांनी खरातच्या कोठडीची मागणी केली होती. सिन्नर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी अशोक खरातला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या आर्थिक व्यवहारांचा पैसा नक्की येतो कुठून आणि त्याचा विनियोग कसा झाला, याचा सखोल तपास आता पोलीस करणार आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number