IPL 2026: सनरायझर्स हैदराबादची मोठी घोषणा; ‘या’ खेळाडूकडे कर्णधारपद, तर अभिषेक शर्मावर उपकर्णधारपदाची धुरा

अनुभवी ऑस्ट्रेलियन खेळाडू पॅट कमिन्स दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार असल्याने, फ्रँचायझीने आक्रमक फलंदाजाकडे संघाचे कर्णधारपद सोपवले आहे.

IPL 2026: सनरायझर्स हैदराबादची मोठी घोषणा; ‘या’ खेळाडूकडे कर्णधारपद, तर अभिषेक शर्मावर उपकर्णधारपदाची धुरा

IPL 2026: आयपीएल 2026 चा थरार 28 मार्चपासून सुरू होत असून, या भव्य स्पर्धेपूर्वी सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाने आपल्या नेतृत्वाबाबत एक मोठी घोषणा केली आहे. अनुभवी ऑस्ट्रेलियन खेळाडू पॅट कमिन्स दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार असल्याने, फ्रँचायझीने आक्रमक फलंदाज ईशान किशनकडे संघाचे कर्णधारपद सोपवले आहे. नुकत्याच झालेल्या 2026 च्या T20 विश्वचषकात ईशानने केलेल्या चमकदार कामगिरीची दखल घेत ही जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर, युवा अष्टपैलू खेळाडू अभिषेक शर्माची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली असून, या दोन्ही युवा खेळाडूंवर संघाला विजयी सुरुवात करून देण्याचे मोठे आव्हान असेल.

पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत ईशान किशनचे नेतृत्व
सनरायझर्स हैदराबादने ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट करत स्पष्ट केले की, जोपर्यंत पॅट कमिन्स पूर्णपणे तंदुरुस्त होत नाही, तोपर्यंत ईशान किशन संघाचे नेतृत्व करेल. ईशान किशनला 2025 च्या लिलावात SRH ने 11.40 कोटी रुपयांना आपल्या संघात सामील करून घेतले होते. ईशानच्या नावावर 119 IPL सामन्यांमध्ये 2,998 धावा जमा असून, त्याच्या अनुभवाचा फायदा संघाला निश्चितच होईल. पॅट कमिन्स संघात परतल्यानंतर तो पुन्हा कर्णधारपद स्वीकारेल, अशी अपेक्षा असली तरी सुरुवातीच्या काळात ईशान आणि अभिषेकची जोडी मैदानावर रणनीती आखताना दिसेल.

उद्घाटनाच्या सामन्यात RCB विरुद्ध लढत
सनरायझर्स हैदराबाद आपल्या IPL 2026 मोहिमेची सुरुवात 28 मार्च रोजी बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर करणार आहे. त्यांचा पहिला सामना गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध होणार आहे. यानंतर, संघ कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर KKR शी भिडेल. घरच्या मैदानावर म्हणजेच हैदराबादमध्ये 5 एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध ईशान किशनच्या नेतृत्वाखाली संघ पहिला सामना खेळेल. या महत्त्वपूर्ण सामन्यांनंतर, 11 एप्रिल रोजी पंजाब किंग्जविरुद्ध न्यू चंदीगडमध्ये सामना रंगणार आहे.

हेही वाचा – ODI World Cup 2027: ICC एकदिवसीय विश्वचषक 2027 कधी आणि कुठे खेळला जाईल? महत्त्वाची अपडेट समोर

सनरायझर्स हैदराबादचा संपूर्ण संघ
या हंगामासाठी SRH कडे संतुलित संघ असून यामध्ये पॅट कमिन्स, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, ईशान किशन (कर्णधार), हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, हर्षल पटेल, लियाम लिव्हिंगस्टोन, जयदेव उनाडकट, शिवम मावी आणि जॅक एडवर्ड्स यांसारख्या तगड्या खेळाडूंचा समावेश आहे. गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर संघ मजबूत दिसत असून, ईशान किशनच्या नेतृत्वाखाली संघ यावर्षी विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number