हैदराबाद: Sunrisers Hyderabad ने IPL 2026 च्या 31 व्या सामन्यात Delhi Capitals वर 47 धावांनी दमदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 20 षटकांत 2 बाद 242 धावा उभारल्या. या मोठ्या धावसंख्येमागे अभिषेक शर्मा याच्या तडाखेबंद शतकाचा मोठा वाटा होता.
दिल्लीची सुरुवात मात्र खराब झाली. संघाने 21 धावांवरच पथुम निसांका याची विकेट गमावली. त्यानंतर नितीश राणा आणि केएल राहुल यांनी दुसऱ्या विकेटसाठी 45 चेंडूंमध्ये 86 धावांची भागीदारी करत दिल्लीला सामन्यात टिकवून ठेवले.
केएल राहुलने 23 चेंडूंमध्ये 37 धावा केल्या. त्याच्या खेळीत 1 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. त्यानंतर नितीश राणाने 30 चेंडूंमध्ये 57 धावांची खेळी केली. त्याने 7 चौकार आणि 3 षटकार लगावले. मात्र 107 धावांवर दिल्लीने सलग दुसरी, तिसरी आणि चौथी विकेट गमावली. डेव्हिड मिलर गोल्डन डकवर बाद झाला.
Pacing it perfectly ⏱️#SRH moving nicely to 36/0 after 4 overs! ? Who'll end the powerplay on a high? ? Updates ▶️ https://t.co/VgUjXDlrDh#TATAIPL | #KhelBindaas | #SRHvDC pic.twitter.com/OaKiIH0NGZ — IndianPremierLeague (@IPL) April 21, 2026
चार विकेट्स पडल्यानंतर ट्रिस्टन स्टब्स आणि समीर रिजवी यांनी पाचव्या विकेटसाठी 33 चेंडूंमध्ये 59 धावांची भागीदारी केली. मात्र ही भागीदारी दिल्लीला केवळ पराभवाचे अंतर कमी करण्यातच मदत करू शकली. स्टब्सने 16 चेंडूंमध्ये 27 धावा केल्या.
स्टब्स बाद झाल्यानंतर दिल्लीची फलंदाजी पूर्णपणे कोसळली. संघाने 186, 192, 195 आणि पुन्हा 195 धावांवर विकेट्स गमावल्या. अखेरीस दिल्लीचा डाव 20 षटकांत 9 बाद 195 धावांवर संपला.
The #SRH skipper wants a piece of the action too ? Ishan Kishan and Abhishek Sharma are keeping the momentum firmly at the top! ? Updates ▶️ https://t.co/VgUjXDlrDh#TATAIPL | #KhelBindaas | #SRHvDC | @SunRisers pic.twitter.com/X8U5MTvHbS — IndianPremierLeague (@IPL) April 21, 2026
हैदराबादच्या गोलंदाजांमध्ये मलिंगा याने 4 विकेट्स घेतल्या, तर हर्ष दुबे याने 3 विकेट्स घेत महत्त्वाची भूमिका बजावली. हा हैदराबादचा घरच्या मैदानावरील सलग तिसरा विजय ठरला.