Sugarcane Crushing Season: यंदा 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार ऊस गाळप हंगाम; पूरग्रस्तांसाठी प्रतिटन 5 रुपये कपात जाहीर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत सन 2025-26 ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबर 2025 पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला.

Sugarcane Crushing Season: यंदा 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार ऊस गाळप हंगाम; पूरग्रस्तांसाठी प्रतिटन 5 रुपये कपात जाहीर

Sugarcane Crushing Season: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. परिणामी राज्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, काही ठिकाणी अजूनही पूरस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत सन 2025-26 ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबर 2025 पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रति टन 10 रुपये कपात आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी प्रति टन 5 रुपये कपात करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सहकार आयुक्त दीपक तावरे आणि साखर संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

हेही वाचा – Dasara Melava 2025: राज्यात दसरा मेळाव्यांची जय्यत तयारी सुरू; 'या' 5 दसरा मेळाव्यांमुळे विजयादशमीच्या दिवशी राजकीय वातावरण तापणार

प्रति मेट्रिक टन 3,550 रुपये एफआरपी निश्चित 

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, यंदा गाळप होणाऱ्या ऊसासाठी प्रति मेट्रिक टन 3,550 रुपये एफआरपी निश्चित करण्यात आले आहे, तर बेसिक उताऱ्यासाठी 10.25 टक्के देण्यात येणार आहे. गेल्या हंगामात सुमारे 200 साखर कारखान्यांनी गाळप केले, ज्यात 99 सहकारी आणि 101 खासगी कारखान्यांचा समावेश होता. शेतकऱ्यांना एकूण 31,301 कोटी रुपयांची एफआरपी अदा करण्यात आली असून राज्याने 99.06 टक्के एफआरपी पूर्ण केली आहे. यामध्ये 100 टक्के एफआरपी केलेल्या कारखान्यांची संख्या 148 आहे.

हेही वाचा – ST Bus Fare in Diwali : मोठी बातमी! दिवाळीचा प्रवास महागला, गावी जाण्यासाठी जादा पैसे; ST महामंडळाकडून भाडेवाढीचा निर्णय

इथेनॉल विक्रीतून 6,378 कोटी रुपयांचे उत्पन्न 

याशिवाय, सहवीज निर्मिती प्रकल्पांतर्गत सन 2024-25 मध्ये कारखान्यांनी 298 कोटी युनिट्स वीज निर्यात केली, ज्यातून कारखान्यांना 1,979 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. तसेच, इथेनॉल विक्रीतून 6,378 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले. तथापी, यादरम्यान, ऊस तोडणीसाठी यांत्रिकीकरण आणि सहवीज निर्मितीबाबत सविस्तर चर्चा झाली. सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी याबाबत सादरीकरण केले. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number