Agro Study Tour: राज्यातील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! युरोप-चीनमधील प्रगत शेती शिकण्यासाठी राज्य सरकार देणार 2 लाखांचे अनुदान; कसा करायचा अर्ज?

या उपक्रमांतर्गत शेतकरी बांधवांना युरोप आणि चीनमधील अद्ययावत कृषी पद्धतींचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी मिळणार असून, त्यासाठी राज्य सरकारकडून थेट आर्थिक मदत पुरवली जाणार आहे.<br/>

Agro Study Tour: राज्यातील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! युरोप-चीनमधील प्रगत शेती शिकण्यासाठी राज्य सरकार देणार 2 लाखांचे अनुदान; कसा करायचा अर्ज?

Agro Study Tour : आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून राज्यातील शेतीचा दर्जा उंचावण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी शासनाने 'शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे' ही विशेष योजना सुरू केली आहे. या उपक्रमांतर्गत शेतकरी बांधवांना युरोप आणि चीनमधील अद्ययावत कृषी पद्धतींचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी मिळणार असून, त्यासाठी राज्य सरकारकडून थेट आर्थिक मदत पुरवली जाणार आहे.

50 टक्के आर्थिक साहाय्य 
या परदेश अभ्यासदौऱ्यासाठी लागणाऱ्या एकूण खर्चाच्या 50 टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंतचे भरीव अनुदान शासनाकडून दिले जाईल. या योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यासाठी एकूण 5 शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे. यामध्ये 1 महिला शेतकरी, 1 कृषी पुरस्कारप्राप्त किंवा पीक स्पर्धेतील विजेता शेतकरी आणि 3 सर्वसाधारण शेतकऱ्यांचा समावेश असेल. अर्जदारांची संख्या जास्त असल्यास लकी ड्रॉ म्हणजेच लॉटरी पद्धतीने पारदर्शकपणे लाभार्थ्यांची निवड केली जाईल.

 'या' अटी पूर्ण करणाऱ्यांनाच संधी
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याचे वय किमान 25 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच शेती हेच त्यांचे उपजीविकेचे मुख्य साधन असावे; कोणत्याही सरकारी किंवा खाजगी नोकरीतील व्यक्ती यास पात्र असणार नाही. अर्जदाराकडे किमान 1 वर्षाची वैधता असलेला पासपोर्ट असणे तसेच 'AgriStack' प्रणालीअंतर्गत फार्मर आयडी असणे अनिवार्य आहे. विशेष म्हणजे एका शेतकरी कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल आणि यापूर्वी शासनाच्या मदतीने परदेश दौरा केलेल्यांना यात सहभागी होता येणार नाही.

हेही वाचा – Shivsena MP Meet Amit Shah : खासदारांनंतर आता ठाकरेंचे आमदार शिंदेसेनेच्या गळाला? श्रीकांत शिंदेंसह शिवसेना खासदारांनी घेतली शाहांची भेट

'या' कागदपत्रांसह तालुका कार्यालयात संपर्क साधा
या अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यास उत्सुक असलेल्या शेतकऱ्यांनी वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे. अर्जासोबत चालू कालावधीचा 7/12 व 8अ उतारा, पासपोर्टची प्रत, आधार कार्ड, रेशन कार्ड आणि वैद्यकीय प्रमाणपत्र जोडून 17 ऑगस्ट 2026 पूर्वी आपले अर्ज संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जमा करावेत. रत्नागिरीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बंधू-भगिनींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number