Dr. B. R. Ambedkar Mahaparinirvan : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यातून 15 विशेष गाड्या, असे आहे वेळापत्रक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातून 15 विशेष गाड्या मुंबईसाठी धावणार आहेत.

Dr. B. R. Ambedkar Mahaparinirvan : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यातून 15 विशेष गाड्या, असे आहे वेळापत्रक

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी महाराष्ट्र आणि देशभरातून लाखो अनुयायी मुंबईत येत असतात. यंदाही लाखो आंबेडकर अनुयायी (Ambedkar Followers) मुंबईत येण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वेने (Central Railway) प्रवाशांची अपेक्षित गर्दी लक्षात घेऊन त्यांच्या सोयीसाठी विस्तृत व्यवस्था (Crowd Management in Mumbai) केली आहे. गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी, 4 ते 8 डिसेंबर 2025 या कालावधीत रेल्वेने 15 विशेष अनारक्षित गाड्या (Unreserved Special Trains) चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

या विशेष गाड्या प्रामुख्याने नागपूर-सीएसएमटी, दादर-नागपूर, कलबुर्गी-सीएसएमटी, अमरावती-सीएसएमटी आणि कोल्हापूर-सीएसएमटी या महत्त्वपूर्ण मार्गांवर धावणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर-मुंबई विभागात सर्वाधिक रेल्वे सेवा उपलब्ध असतील. या गाड्यांच्या तारखा, वेळापत्रक, थांबे आणि कोच संरचना मध्य रेल्वेने जाहीर केली आहे. या गाड्या नागपूर, अमरावती, कलबुर्गी आणि कोल्हापूर येथून मुंबई-दादर मार्गांसाठी उपलब्ध असतील.

असे असेल वेळापत्रक –
(अ) नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस: 4 सेवा
04 डिसेंबर 2025 रोजीच्या गाड्या
1) गाडी क्रमांक 01260
नागपूर प्रस्थान: 18:15
मुंबई CSMT आगमन: 10:55 (पुढील दिवशी)
2) गाडी क्रमांक 01262
नागपूर प्रस्थान: 23:55
मुंबई CSMT आगमन: 15:30 (पुढील दिवशी)
05 डिसेंबर 2025 रोजीच्या गाड्या
1) गाडी क्रमांक 01264
नागपूर प्रस्थान: 08:00
मुंबई CSMT आगमन: 23:45 (त्याच दिवशी)
2) गाडी क्रमांक 01266
नागपूर प्रस्थान: 18:15
मुंबई CSMT आगमन: 10:55 (पुढील दिवशी)
थांबे: अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जालंब, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण, दादर.
(ब) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर : 4 सेवा
1) 06 डिसेंबर 2025
गाडी क्रमांक 01249
CSMT प्रस्थान: 20:50
नागपूर आगमन: 11:20 (पुढील दिवशी)
2) 07 डिसेंबर 2025
गाडी क्रमांक 01251
CSMT प्रस्थान: 10:30
नागपूर आगमन: 00:55 (पुढील दिवशी)
गाडी क्रमांक 01255
CSMT प्रस्थान: 12:35
नागपूर आगमन: 03:00 (पुढील दिवशी)
3) 08 डिसेंबर 2025
गाडी क्रमांक 01257
CSMT प्रस्थान: 00:20
नागपूर आगमन: 16:10 (त्याच दिवशी)
दादर – नागपूर : 1 सेवा
1) 07 डिसेंबर 2025
गाडी क्रमांक 01253
दादर प्रस्थान: 00:40
नागपूर आगमन: 16:10
थांबे: दादर, कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, जालंब, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम, अजनी.
कोच संरचना: 18 ICF कोचेस, 16 द्वितीय श्रेणी शयनयान/सामान्य कोच/चेअर कार व 2 गार्ड ब्रेक व्हॅन.
(क) कलबुर्गी – CSMT – कलबुर्गी : 2 सेवा
1) गाडी क्रमांक 01245
कलबुर्गी प्रस्थान: 05 डिसेंबर 2025 – 18:30
CSMT आगमन: 06 डिसेंबर – 08:20
2) गाडी क्रमांक 01246
CSMT प्रस्थान: 07 डिसेंबर 2025 – 00:25
कलबुर्गी आगमन: 11:30 (त्याच दिवशी)
कोच संरचना: 24 ICF कोचेस, 22 शयनयान/सामान्य/चेअर कार आणि 2 गार्ड व्हॅन
थांबे: दादर, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर, अक्कलकोट रोड, गाणगापूर रोड
(ड) अमरावती – CSMT – अमरावती : 2 सेवा
1) गाडी क्रमांक 01218
अमरावती प्रस्थान: 05 डिसेंबर 2025 – 17:45
CSMT आगमन: 06 डिसेंबर – 05:25
2) गाडी क्रमांक 01217
CSMT प्रस्थान: 07 डिसेंबर 2025 – 00:40
अमरावती आगमन: 12:50
कोच संरचना: 18 ICF कोचेस — 16 शयनयान/सामान्य/चेअर कार + 2 गार्ड व्हॅन
थांबे: दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा
(इ) कोल्हापूर – CSMT – कोल्हापूर : 2 सेवा
1) गाडी क्रमांक 01402
कोल्हापूर प्रस्थान: 05 डिसेंबर 2025 – 16:40
CSMT आगमन: 06 डिसेंबर – 04:05
2) गाडी क्रमांक 01401
CSMT प्रस्थान: 06 डिसेंबर 2025 – 22:30
कोल्हापूर आगमन: 07 डिसेंबर – 10:00
कोच संरचना: 18 ICF कोचेस, 16 शयनयान/सामान्य/चेअर कार आणि 2 गार्ड व्हॅन असतील.
थांबे: दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, चिंचवड, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली, मिरज, जयसिंगपूर, हातकणंगले.

हेही वाचा – Eastern Free Way: मुंबई-ठाणे प्रवासाला नवी गती; MMRDA चा एलेव्हेटेड ईस्टर्न फ्रीवे विस्तार प्रकल्प सुरु

इथं मिळेल संपूर्ण माहिती
गाड्यांचे सविस्तर वेळापत्रक, थांबे, विलंब किंवा इतर माहिती जाणून घेण्यासाठी प्रवाशांनी अधिकृत संकेतस्थळ www.enquiry.indianrail.gov.in येथे तपासावे. तसेच, अधिक सोप्या वापरासाठी NTES अॅप डाउनलोड करून प्रत्यक्ष वेळेची माहिती मिळवता येते.

हेही वाचा – AI Ticket Scam: AI च्या मदतीने तयार केली मुंबई लोकलची बनावट तिकिटे! TTE च्या हुशारीने पितळ उघडं पडलं

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number