Smriti Mandhana Father's Health Deteriorated: भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार फलंदाज स्मृती मानधना हिच्या लग्नसोहळ्याआधीच मोठी अनपेक्षित घटना घडली असून संपूर्ण समारंभात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सांगलीतील त्यांच्या फार्महाऊसवर रविवारी स्मृतीचा लग्न सोहळा पार पडणार होता. शनिवारी रात्री मेहंदी आणि संगीताची रंगतदार कार्यक्रम पार पडला होता. मात्र, मुख्य विधीच्या काही तासांपूर्वीच स्मृतीच्या वडिलांची तब्येत गंभीररीत्या बिघडल्याने सर्वांची चिंता वाढली. प्राप्त माहितीनुसार, स्मृती मानधनाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला असून आता स्मृतीचा विवाहसोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.
हेही वाचा – Smriti Mandhana Wedding: स्मृतीच्या मंधानाच्या लग्नात मोजक्यांनाच प्रवेश, दिग्गजांना प्रवेश नाही?
विवाहस्थळी अचानक गोंधळ
स्मृती मानधनाचे वडील समारंभादरम्यान अस्वस्थ झाले आणि त्यांची प्रकृती झपाट्याने खालावू लागली. पाहुण्यांमध्ये आणि नातेवाईकांमध्ये क्षणार्धात भीतीचे वातावरण निर्माण झाले. तातडीने अॅम्ब्युलन्स बोलावून त्यांना सांगलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या त्यांची तब्येत स्थिर असून त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे लग्नस्थळी काही काळ तणावाचे वातावरण होते. स्मृती मानधनाच्या लग्नाला फारशी गर्दी ठेवण्यात आलेली नाही. निकटवर्तीय आणि मोजके मान्यवर यांच्या उपस्थितीत दुपारी चार वाजता विवाह विधी सुरू होणार होते. मात्र आता हा लग्नसोहळा पुढे ढकलण्यात आल्याचं समजतयं.
हेही वाचा – Rishabh Pant Angry On Kuldeep: 'तु घरी खेळतोयस का?' गुवाहाटी कसोटीत ऋषभ पंतचा कुलदीपवर संताप
दरम्यान, स्मृती मानधना आणि पलाश यांचे नाते 2019 मध्ये सुरू झाले. काही वर्षे त्यांनी आपली प्रेमकहाणी खाजगी ठेवली, पण 2024 मध्ये दोघांनीही आपल्या रिलेशनशिपची घोषणा केली. याच वर्षी डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये पलाशने सर्वांसमोर गुडघ्यावर बसून स्मृतीला प्रपोज केले होते. त्यांचा तो रोमँटिक क्षण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.