Manas Patil: सहा वर्षांच्या जलतरणपटूचा अरबी समुद्रात विश्वविक्रम; नागाव-जेएनपीटी 17 किलोमीटरचे अंतर पोहून केलं पार

'शिवतीर्थ' या निवासस्थानी झालेल्या या भेटीत राज ठाकरे यांनी या चिमुरड्या चॅम्पियनचे भरभरून कौतुक केले आणि त्याला शुभेच्छा म्हणून 'गणपतीची मूर्ती' भेट दिली.

Manas Patil: सहा वर्षांच्या जलतरणपटूचा अरबी समुद्रात विश्वविक्रम; नागाव-जेएनपीटी 17 किलोमीटरचे अंतर पोहून केलं पार

Manas Patil: महाराष्ट्रातील अवघ्या 6 वर्षांच्या मानस पाटील या चिमुरड्याने अरबी समुद्रात आपल्या जलतरण कौशल्याचा असा काही चमत्कार दाखवला आहे की, संपूर्ण क्रीडा जगतात त्याचे कौतुक होत आहे. या ऐतिहासिक कामगिरीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मानस पाटील याला आवर्जून भेटीसाठी बोलावले. ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी झालेल्या या भेटीत राज ठाकरे यांनी या चिमुरड्या चॅम्पियनचे भरभरून कौतुक केले आणि त्याला शुभेच्छा म्हणून ‘गणपतीची मूर्ती’ भेट दिली. एका लहान मुलाने इतक्या कमी वयात दाखवलेले हे धाडस पाहून राज ठाकरे यांनी आश्चर्य व्यक्त केले.

17 किलोमीटरचे अंतर आणि जोरदार लाटा; मानसचा जिद्दी प्रवास
मानस पाटील याने पिरवाडी समुद्रकिनाऱ्यापासून जेएनपीटी (JNPT) बंदरापर्यंतचे सुमारे 17 किमी अंतर अवघ्या 4 तास 49 मिनिटांत पोहून पार केले. समुद्रातील जोरदार लाटा, पाण्याचा वेगवान प्रवाह आणि प्रतिकूल परिस्थितीला न डगमगता त्याने हे आव्हान पेलले. नागाव ते जेएनपीटी असे हे अंतर पोहणारा तो जगातील सर्वात तरुण जलतरणपटू ठरला आहे. त्याच्या या पराक्रमाने जलतरण क्षेत्रात एका नव्या विश्वविक्रमाची नोंद झाली असून, भविष्यातील एक मोठा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे.

हेही वाचा – Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवला ‘धुरंधर’ची भुरळ; अक्षय खन्नाच्या गाण्यावर धरला ठेका, पाहा व्हायरल व्हिडीओ

प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबाचा पाठिंबा
सहा वर्षांच्या वयात असा पराक्रम करणे साधी गोष्ट नाही. मानसने यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून कडक सराव केला होता. जोरदार लाटांना तोंड देण्याचे तंत्र आणि समुद्रातील प्रवाहात टिकून राहण्याचे कौशल्य त्याने आत्मसात केले होते. या यशात त्याच्या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या जिद्दीचा मोठा वाटा आहे. राज ठाकरे यांच्या भेटीमुळे मानस आणि त्याच्या कुटुंबीयांचा हुरूप अधिकच वाढला आहे. “ही केवळ सुरुवात असून मानसला भविष्यात देशासाठी मोठी पदके जिंकायची आहेत,” असा विश्वास त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number