DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ; ‘या’ तारखेपासून खात्यात जमा होणार वाढीव पगार

राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) 3 टक्के वाढ करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ; ‘या’ तारखेपासून खात्यात जमा होणार वाढीव पगार

DA Hike: महागाईच्या झळा सोसणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) 3 टक्के वाढ करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. या निर्णयामुळे आता राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55 टक्क्यांवरून थेट 58 टक्क्यांवर पोहोचला आहे.

विधान परिषदेत मोठी घोषणा
वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत यासंदर्भातील अधिकृत निवेदन सादर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर आर्थिक भार पडणार असला, तरी कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक अर्थव्यवस्थेला यामुळे मोठा आधार मिळणार आहे.

थकबाकी आणि अंमलबजावणीचे गणित
ही दरवाढ जुलै 2025 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आली आहे. जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या चार महिन्यांच्या थकबाकीची रक्कम कर्मचाऱ्यांना मार्च 2026 च्या पगारात दिली जाईल. नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीतील थकबाकीबाबत सरकार लवकरच स्वतंत्र आदेश जारी करणार आहे.

हेही वाचा – Credi Card New Rules : आता क्रेडिट कार्डचं बिल न भरल्यास होणार तुरूंगवास? नेमका काय आहे नियम?

कोणाकोणाला मिळणार लाभ?
सरकारच्या या निर्णयाचा फायदा राज्यातील एकूण 14 लाखांहून अधिक कुटुंबांना होणार आहे. सुमारे 5.96 लाख कार्यरत अधिकारी व कर्मचारी तसेच सुमारे 8.12 लाख पेन्शनधारकांना याचा लाभ मिळणार आहे. राज्य शासन कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आणि आर्थिक सुरक्षिततेसाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी वित्त राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे कर्मचारी संघटनांनी समाधान व्यक्त केले असून सरकारचे आभार मानले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number