Shubman Gill Injury Update: भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार शुभमन गिलला मानेला झालेल्या दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तो कोलकात्यात ईडन गार्डन्सवर सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून बाहेर पडला आहे. गिलच्या अनुपस्थितीत ऋषभ पंत संघाचे नेतृत्व करत आहे. दुसऱ्या दिवशी फलंदाजीदरम्यान गिलला अचानक मानेला त्रास जाणवला. दुखापत गंभीर असल्याचे लक्षात येताच त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.
बीसीसीआयचे अधिकृत निवेदन
बीसीसीआयने गिलच्या आरोग्याबद्दल माहिती देत सांगितले की, “कर्णधार शुभमन गिलला कोलकाता येथे सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मानेला दुखापत झाली. दिवसाच्या खेळानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. तो सध्या रुग्णालयात आहे. तो पहिल्या कसोटीतून बाहेर आहे. बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याच्यावर लक्ष ठेवत राहील.”
हेही वाचा – IPL 2026 Retentions List: कोण रिटेन अन् कोणाला केलं रिलीज? सर्व 10 आयपीएल संघांची यादी जाहीर
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटीमध्ये भारतीय संघ प्रभावी कामगिरी करत आहे. जसप्रीत बुमराहच्या पाच विकेट्समुळे दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 159 धावांत संपला. तथापि, भारताला पहिल्या डावात फक्त 30 धावांची आघाडी मिळाली आणि त्यांचा संघ 189 धावांतच संपला. भारताकडून पहिल्या डावात केएल राहुल (39) ने सर्वाधिक धावा केल्या, तर सायमन हार्मरने चार विकेट्स घेतल्या.
? Update ? Captain Shubman Gill had a neck injury on Day 2 of the ongoing Test against South Africa in Kolkata. He was taken to the hospital for examination after the end of day's play. He is currently under observation in the hospital. He will take no further part in the… pic.twitter.com/o7ozaIECLq — BCCI (@BCCI) November 16, 2025
हेही वाचा – Shubman Gill and Sara Tendulkar : शुभमन आणि साराच्या लग्नाचा बार कधी उडवणार? गिलच्या वडिलांनी क्लिअरच केलं..
दरम्यान, दुसऱ्या दिवशी, रवींद्र जडेजाने शानदार गोलंदाजी केली आणि दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात चार विकेट्स घेतल्या. दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस, दक्षिण आफ्रिकेने 93 धावा केल्या होत्या परंतु त्यांनी सात विकेट्स गमावल्या. सध्या सामना भारताच्या नियंत्रणात असून, दक्षिण आफ्रिका कोणते आव्हानात्मक लक्ष्य ठेवते याकडे सर्वांचे लक्ष आहे.