Tejasvi Ghosalkar: ‘शिवसेनेने मला ओळख दिली, पण अभिषेकला न्याय मिळवून देण्यासाठी…’; भाजपात प्रवेश केल्यानंतर तेजस्वी घोसाळकर यांची प्रतिक्रिया

दिवंगत माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सून असलेल्या तेजस्वी घोसाळकर यांनी आज भाजमध्ये प्रवेश केला.

Tejasvi Ghosalkar: ‘शिवसेनेने मला ओळख दिली, पण अभिषेकला न्याय मिळवून देण्यासाठी…’; भाजपात प्रवेश केल्यानंतर तेजस्वी घोसाळकर यांची प्रतिक्रिया

Tejasvi Ghosalkar: ठाकरे गटाशी दीर्घकाळ निष्ठा राखलेल्या घोसाळकर कुटुंबातील तेजस्वी घोसाळकर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. दिवंगत माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सून असलेल्या तेजस्वी घोसाळकर यांचा पक्षप्रवेश मंत्री प्रवीण दरेकर आणि भाजप मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या उपस्थितीत पार पडला. भाजपात सहभागी झाल्यानंतर तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे गटावर थेट टीका टाळली. मात्र, ज्या पक्षाने आपल्याला राजकीय ओळख दिली, तो पक्ष सोडताना मनाला वेदना होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी न्याय मिळवून देण्यासाठीच आपण हा निर्णय घेतल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

यावेळी बोलताना तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या, ‘2017 साली मी शिवसेनेकडून नगरसेविका म्हणून निवडून आले होते. आज भाजपात प्रवेश करताना मनात अनेक भावना आहेत. मंत्री प्रवीण दरेकर आणि आमदार अमित साटम यांनी माझं स्वागत केलं, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. हा निर्णय माझ्यासाठी सोपा नव्हता. पक्ष आणि परिवारापासून दूर जाताना वाईट वाटतंय. ज्या पक्षामुळे मला ओळख मिळाली, तो सोडताना दुःख होत आहे. मात्र, माझ्या प्रभागातील विकासकामांसाठी हा निर्णय घ्यावा लागला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही कामं मार्गी लागतील, अशी मला आशा आहे.’

हेही वाचा – Aditya Thackeray On BJP: ‘भाजप म्हणजे बिल्डर जनता पार्टी…’; पागडी इमारतींच्या मुद्द्यावर आदित्य ठाकरेंची घणाघाती टीका

दरम्यान, अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येच्या तपासाबाबत विचारण्यात आलं असता, त्यांनी चिंता व्यक्त केली. ‘सुमारे दीड वर्षांपूर्वी अभिषेकची अत्यंत क्रूरपणे हत्या झाली. या प्रकरणाचा तपास अजूनही संथ गतीने सुरू आहे. सीबीआयने याचा लवकरात लवकर निकाल लावावा, अशी माझी मागणी आहे. भाजपात प्रवेश केल्यानंतर या प्रकरणाला गती मिळेल आणि आमच्या कुटुंबाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे,’ असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.  

हेही वाचा – Tejasvee Ghosalkar Resignation: भाजप प्रवेशापूर्वी तेजस्वी घोसाळकर चर्चेत ; भावनिक पोस्ट करत कारणही सांगितलं

पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, पक्ष जे काम सोपवेल ते त्या पूर्ण निष्ठेने पार पाडतील. जसं मी शिवसेनेत काम केलं, तसंच नव्हे तर त्याहून अधिक जोमाने भाजपात काम करेन, अशी ग्वाहीही यावेळी तेजस्वी घोसाळकर यांनी दिली. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number