शिवसेना पक्षप्रमुखांचं बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन

शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारला आहे. तसेच शिवसेना आणि अपक्ष आमदार मिळून ५५ आमदार शिंदेंच्या बंडात सामील झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेत मोठं खिंडार पडलं असून महाविकास आघाडी सरकारवर मोठं संकट कोसळलं आहे. अशातच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गुवाहाटी येथील बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन केले आहे. मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव […]

शिवसेना पक्षप्रमुखांचं बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन

शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारला आहे. तसेच शिवसेना आणि अपक्ष आमदार मिळून ५५ आमदार शिंदेंच्या बंडात सामील झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेत मोठं खिंडार पडलं असून महाविकास आघाडी सरकारवर मोठं संकट कोसळलं आहे. अशातच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गुवाहाटी येथील बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक पत्र प्रसिद्ध करून बंडखोर आमदारांनी आवाहन केले आहे. मी तुमचा कुटुंबप्रमुख आहे. आपल्या भावनांचा मला आदर आहे. त्यामुळे चर्चेला या. अजूनही वेळ गेली नाहीए, असे भावनिक आवाहन ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना केले आहे. तसेच शिवसैनिक आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करू तर, कुणाच्याही भूलपाथांना बळी पडू नका असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

पत्रात काय म्हटलंय?

आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे, आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत, आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो, कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही, माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्या समोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा, यातून निश्चित मार्ग निघेल, आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका, शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही, समोर आलात बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number