Sharad Pawar Health Update : शरद पवार मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट समोर

शरद पवार यांना बुधवारी (25 फेब्रुवारी) सकाळी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यानंतर ते तातडीने मुंबईत दाखल झाले.

Sharad Pawar Health Update : शरद पवार मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट समोर

Sharad Pawar Health Update: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) अध्यक्ष शरद पवार यांना बुधवारी (25 फेब्रुवारी) सकाळी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यानंतर ते तातडीने मुंबईत दाखल झाले असून, प्रकृतीच्या नियमित तपासणीसाठी त्यांना मुंबईतील सुप्रसिद्ध ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुण्यातून डिस्चार्ज आणि तब्येतीत सुधारणा
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांना उलट्या आणि अशक्तपणामुळे (डिहायड्रेशन) त्रास होत होता. 22 फेब्रुवारी रोजी त्यांना पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी नेण्यात आले होते. डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्यांच्या सर्व चाचण्यांचे रिपोर्ट नॉर्मल आले आहेत. प्रकृती स्थिर असली तरी पूर्ण विश्रांती मिळावी यासाठी त्यांना पुण्यात दोन दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते.

ब्रीच कँडीमध्ये पुढील तपासणी
पुण्यातील उपचार पूर्ण झाल्यानंतर पवार साहेब आज सकाळी मुंबईत परतले. प्रकृतीबाबत कोणतीही जोखीम न पत्करता, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते आता ब्रीच कँडी रुग्णालयात रुटीन फॉलोअपसाठी आले आहेत. पुढील 2 ते 3 दिवस ते डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली राहतील आणि त्यांच्या काही आवश्यक चाचण्या केल्या जातील.

हेही वाचा – BMC Budget 2026: मुंबईकरांच्या विकासासाठी BMC च्या तिजोरीचे कुलूप उघडले; महापालिकेच्या 36 हजार कोटींच्या ठेवी मोडणार

कार्यकर्त्यांना दिलासा
शरद पवार यांची प्रकृती आता उत्तम आणि स्थिर असल्याचे समजते. केवळ दगदग टाळण्यासाठी आणि नियमित देखरेखीसाठी त्यांना रुग्णालयात ठेवले जाणार असल्याची माहिती समोर आल्याने कार्यकर्त्यांमधील चिंतेचे वातावरण कमी झाले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number