Mumbai Local: नवी मुंबईतील प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाकडून आनंदाची बातमी आली आहे. सीवूड्स दारवे-बेलापूर-उरण या महत्त्वाच्या रेल्वेमार्गावर ऑक्टोबरपासून 20 अतिरिक्त लोकल फेऱ्या सुरू होणार आहेत. या निर्णयामुळे प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर होणार असून प्रवाशांचा मौल्यवान वेळही वाचणार आहे. सध्या या मार्गावर मर्यादित लोकल गाड्या असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
गर्दीच्या वेळी लोकल एका तासाच्या अंतराने आणि इतर वेळी दीड तासांच्या अंतराने धावत असल्याने अनेकदा प्रवाशांना ताटकळत थांबावे लागते. आता नव्या 10 अप आणि 10 डाउन अशा एकूण 20 लोकल फेऱ्या सुरू झाल्यानंतर गाड्यांची एकूण संख्या 40 वरून 60 होणार आहे. यामुळे प्रवाशांना प्रतीक्षेच्या त्रासातून मोठा दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा – Industrial Water Tariff Hike: औद्योगिक पाणीपट्टीत तिपटीने वाढ! पुणे-सांगलीतील उद्योजकांमध्ये संताप
दरम्यान, रेल्वे प्रशासनाने सांगितले की, नवी मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय, भविष्यात उरणमार्गावरील प्रवासी संख्या आणखी वाढण्याचा अंदाज आहे.
हेही वाचा – Marathwada Heavy Rain: मराठवाड्यात पावसाचा तडाखा! 24 तासांत 8 जणांचा मृत्यू, शेकडो जनावरे दगावली
विशेष म्हणजे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम अंतिम टप्प्यात आहे. विमानतळालगतच असलेल्या तारघर स्टेशनमुळे या मार्गावरील प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल, असा रेल्वेचा अंदाज आहे. त्यानुसार, आगामी काळात टप्प्याटप्प्याने आणखी लोकल फेऱ्या सुरू करण्याचीही तयारी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.