IMD Weather Update: मे महिन्यात उन्हाच्या झळा की पावसाचा दिलासा? IMD कडून मान्सूनच्या आगमनाबाबत मोठी अपडेट

या महिन्यात देशातील काही भागांत पारा खाली येणार असून काही ठिकाणी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.<br/>

IMD Weather Update: मे महिन्यात उन्हाच्या झळा की पावसाचा दिलासा? IMD कडून मान्सूनच्या आगमनाबाबत मोठी अपडेट

IMD Weather Update: एप्रिलमधील लाहीलाही करणाऱ्या उष्णतेनंतर आता मे महिन्याचे हवामान कसे असेल, याबाबत भारतीय हवामान विभागाने (IMD) महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. या महिन्यात देशातील काही भागांत पारा खाली येणार असून काही ठिकाणी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

रात्री उकाडा वाढणार?
हवामान विभागाचे महासंचालक एम. महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात देशातील बहुतांश भागांत कमाल तापमान सामान्य किंवा त्यापेक्षा कमी राहण्याची चिन्हे आहेत. मात्र, रात्रीच्या किमान तापमानात वाढ होणार असल्याने रात्रीचा उकाडा कायम राहू शकतो. विशेषतः दक्षिण आणि वायव्य भारतात तापमानाचा पारा सरासरीपेक्षा वर राहण्याचा अंदाज आहे.

पावसाची शक्यता आणि दिलासा
मे महिन्यात देशात सरासरीच्या 110 टक्के (सुमारे 61.4 मिमी) पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळू शकतो. मात्र, पूर्व आणि ईशान्य भारतात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता असल्याने तिथे कोरडे हवामान कायम राहू शकते.

मान्सून कधी धडकणार?
बळीराजासह सर्व देशाचे लक्ष लागून असलेल्या मान्सूनबाबत हवामान विभागाने सुखद अपडेट दिली आहे.  मान्सून 14 ते 16 मे दरम्यान अंदमानच्या बेटांवर धडक देऊ शकतो. साधारणपणे 20 मे पर्यंत मान्सून अधिक सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. यंदा 'एल निनो' स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने पावसाच्या वितरणावर त्याचा परिणाम होऊ शकतो, असेही हवामान मॉडेल्स सुचवत आहेत.

हेही वाचा – Dattatray Bharane : 'यंदा कमी पावसाची शक्यता, आम्ही…'; खत आणि बियाण्यांच्या नियोजनेबाबत दत्तात्रय भरणे यांची शेतकऱ्यांना ग्वाही

उष्णतेची लाट आणि वीज टंचाई
तापमानात घट होणार असली तरी महाराष्ट्र, गुजरात आणि पूर्व किनारपट्टीवरील राज्यांमध्ये अधूनमधून उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) प्रभाव जाणवेल. एप्रिल महिन्यात कडाक्याच्या उन्हामुळे देशातील वीज वापरात 4 टक्के वाढ झाली असून, मे महिन्यातही हा वापर वाढता राहण्याची शक्यता आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number