Nanded Heatstroke Death: नांदेडमध्ये उन्हाचा कहर! पारा 41 अंशांच्या पार, उष्माघाताने एकाचा दुर्दैवी मृत्यू

नांदेडमध्ये उन्हाचा पारा 41 अंशांच्या पार गेला असून, या कडाक्याच्या उन्हामुळे जिल्ह्यात उष्माघाताने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Nanded Heatstroke Death: नांदेडमध्ये उन्हाचा कहर! पारा 41 अंशांच्या पार, उष्माघाताने एकाचा दुर्दैवी मृत्यू

Nanded Heatstroke Death: गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यासह मराठवाड्यात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असून, नांदेड जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेने ग्रासले आहे. नांदेडमध्ये उन्हाचा पारा 41 अंशांच्या पार गेला असून, या कडाक्याच्या उन्हामुळे जिल्ह्यात उष्माघाताने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाकडून वाढत्या उष्म्यापासून बचाव करण्यासाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन
जिल्ह्यात सूर्य आग ओकत असल्याने दुपारी 12 ते 4 या वेळेत उन्हाचा चटका अधिक जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर, “नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी आणि अत्यंत गरज असेल तरच दुपारी घराबाहेर पडावे,” असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. बाहेर पडताना डोक्यावर रुमाल, छत्री किंवा टोपीचा वापर करावा आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

हेही वाचा – Bhendwal Bhavishyavani 2026: 370 वर्षांची परंपरा, यंदाचं भाकीत काय सांगतंय? भेंडवळ घटमांडणीतून पाऊस, पीक आणि राजकारणाचे संकेत

राज्यात उष्माघाताचे संकट गडद
केवळ नांदेडच नव्हे, तर विदर्भातही उन्हाचा कहर पाहायला मिळत आहे. यापूर्वी वर्धा आणि अकोल्यातही उष्माघाताने मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. आता नांदेडमध्येही उन्हाचा बळी गेल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. वाढत्या तापमानामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून, बाजारपेठांमध्ये दुपारच्या वेळी शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number