Scholarship Exam 2026: राज्य परीक्षा परिषदेचा शिष्यवृत्ती परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय! विद्यार्थ्यांना मिळाली मोठी संधी

शाळांची नोंदणी आणि विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आता 8 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

Scholarship Exam 2026: राज्य परीक्षा परिषदेचा शिष्यवृत्ती परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय! विद्यार्थ्यांना मिळाली मोठी संधी

Scholarship Exam 2026: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 2026 मध्ये होणाऱ्या पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांसाठीची अर्ज प्रक्रिया आणखी काही दिवसांसाठी खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शाळांची नोंदणी आणि विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आता 8 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली असून, यापूर्वी ही मुदत 30 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली होती. या परीक्षांमध्ये पाचवीसाठीची पूर्व-उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि आठवीसाठीची पूर्व-माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा यांचा समावेश आहे. दोन्ही परीक्षा राज्यभर 22 फेब्रुवारी 2026 रोजी एकाच वेळी आयोजित केल्या जाणार आहेत.

नोंदणी प्रक्रियेतील सुधारणा

शिष्यवृत्ती परीक्षांसाठीची शाळा नोंदणी आणि विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचा मूळ कालावधी 27 ऑक्टोबर 2025 ते 30 नोव्हेंबर 2025 असा होता. मात्र, अनेक शाळांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी अधिक वेळ लागणार असल्याचे लक्षात घेऊन परिषदेने ही वेळमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला. ज्या शाळांनी अद्याप नोंदणी किंवा विद्यार्थ्यांचे अर्ज सादर केलेले नाहीत, त्यांनी नव्या अंतिम मुदतीपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन परिषदेकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा – Bank of India Recruitment: बँक ऑफ इंडियामध्ये 'या' पदांसाठी भरती; कशी असेल निवड प्रक्रिया?

अर्ज सादर करण्याचे सुधारित वेळापत्रक

परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले की, 31 डिसेंबर 2025 नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाइन किंवा ऑफलाइन स्वरूपातील अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. विविध प्रकारच्या शुल्कांसह अर्ज सादर करण्यासाठी राज्य परीक्षा परिषदेमार्फत खालीलप्रमाणे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे:

नियमित शुल्कासह अर्ज सादर करण्याचा कालावधी: 27 ऑक्टोबर 2025 – 8 डिसेंबर 2025
विलंब शुल्क कालावधी: 9 डिसेंबर 2025 – 15 डिसेंबर 2025
अतिविलंब शुल्क कालावधी: 16 डिसेंबर 2025 – 23 डिसेंबर 2025
अतिविशेष विलंब शुल्क कालावधी: 24 डिसेंबर 2025 – 31 डिसेंबर 2025

हेही वाचा – Sophie AI Robot Teacher : 17 वर्षांच्या रँन्चो आदित्य कुमारची कमाल, 'एआय रोबोट शिक्षिके'च्या माध्यमातून वर्गात धडे; विद्यार्थ्यांमध्ये धम्माल

अर्ज कसा कराल?

शाळा नोंदणी तसेच विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळ www.mscepune.in उपलब्ध आहेत. निश्चित तारीख संपल्यानंतर कोणतेही अर्ज विचारात घेतले जाणार नसल्याने सर्व शाळांना वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number