SBI Shut Down Service: 1 डिसेंबरपासून SBI बंद करणार ‘ही’ महत्त्वाची सुविधा; लाखो ग्राहकांवर होणार परिणाम

लहान रकमेच्या व्यवहारांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त मानली जात होती. परंतु, आता बँकेने स्पष्ट केले आहे की 30 नोव्हेंबर 2025 नंतर ऑनलाइन SBI आणि YONO Lite वर ही सुविधा उपलब्ध राहणार नाही.

SBI Shut Down Service: 1 डिसेंबरपासून SBI बंद करणार ‘ही’ महत्त्वाची सुविधा; लाखो ग्राहकांवर होणार परिणाम

SBI Shut Down Service: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या डिजिटल सेवांमध्ये मोठा बदल करण्याची घोषणा केली आहे. 1 डिसेंबरपासून बँकेची लोकप्रिय mCASH सुविधा पूर्णपणे बंद करण्यात येणार असून, याचा सरळ परिणाम लाखो ग्राहकांवर होणार आहे. बँकेने याबाबत अधिकृत सूचनाही जारी केली आहे.

mCASH सेवा म्हणजे काय?  

mCASH ही SBI ची अशी सुविधा होती, ज्याद्वारे ग्राहक केवळ मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडी वापरून झटपट पैसे पाठवू शकत होते. लहान रकमेच्या व्यवहारांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त मानली जात होती. परंतु, आता बँकेने स्पष्ट केले आहे की 30 नोव्हेंबर 2025 नंतर ऑनलाइन SBI आणि YONO Lite वर ही सुविधा उपलब्ध राहणार नाही.

हेही वाचा – Bank Loan Recovery: कर्जदाराचा मृत्यू झाल्यानंतर उर्वरित कर्जाचं काय? अशा वेळी बँका कर्ज माफ करतात का?

बँक mCASH सेवा का बंद करण्यात येत आहे?

SBI च्या माहितीनुसार, mCASH जुने आणि कालबाह्य तंत्रज्ञान वापरते. त्यामुळे, सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि आधुनिक पेमेंट सिस्टीम लागू करण्यासाठी ही सुविधा टप्प्याटप्प्याने बंद केली जात आहे. बँक ग्राहकांना UPI, IMPS, NEFT, RTGS यांसारख्या अधिक सुरक्षित आणि जलद डिजिटल पर्यायांचा वापर करण्याचा सल्ला देत आहे.

हेही वाचा – AI ची सुरूवात कशी झाली? संघर्षदेखील करावा लागला आणि…

1 डिसेंबरनंतर तुम्ही पैसे कसे पाठवणार?

दरम्यान, mCASH सेवा बंद झाल्यामुळे, वापरकर्ते BHIM, SBI Pay (UPI App), IMPS आणि इतर डिजिटल पद्धतींद्वारे पैसे पाठवू शकतात. तथापी, BHIM SBI Pay अॅपद्वारे पेमेंट करणे सोपे आहे. यासाठी प्रथम, अॅपमध्ये लॉग इन करा आणि 'पे' पर्याय निवडा. VPA, अकाउंट-IFSC किंवा QR कोड निवडा आणि आवश्यक माहिती भरा. तुमचे डेबिट अकाउंट निवडा आणि 'टिक मार्क' वर क्लिक करा. शेवटी, तुमचा UPI पिन एंटर करा आणि तुमचे पेमेंट त्वरित प्रक्रिया केले जाईल.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number