Saudi Arabia Airstrike in Yemen 20 Killed : आखाती देशांमध्ये पुन्हा एकदा युद्धाची परिस्थिती निर्माण झाली असून, सौदी अरेबियाने शुक्रवारी येमेनमध्ये भीषण बॉम्बवर्षाव केला आहे. या हवाई हल्ल्यात 20 जणांचा मृत्यू झाला असून, 20 हून अधिक लोक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. येमेनमधील हाद्रामौत भागातील ‘अल-खासाह’ कॅम्पवर हा हल्ला करण्यात आला असून, साऊदर्न ट्रान्सिशनल कौन्सिल (STC) या संघटनेच्या ठिकाणांना सौदीने लक्ष्य केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण आखाती क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सौदी अरेबियाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि सौदी या दोन मित्र राष्ट्रांमधील संबंध आता कमालीचे ताणले गेले आहेत. येमेनमधील फुटीरतावादी संघटना STC ला UAE कडून लष्करी मदत आणि समर्थन मिळत असल्याचा दावा सौदीने केला आहे. आपल्या सीमेला लागून असलेल्या भागात या संघटनेने लष्करी तळांचा ताबा घेतल्याने राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला असल्याचे सौदीचे म्हणणे आहे. जोपर्यंत हे लष्करी तळ पुन्हा ताब्यात मिळत नाहीत, तोपर्यंत बॉम्बवर्षाव सुरूच ठेवण्याचा इशारा सौदीने दिला आहे.
सौदीवर दहशतवादी संघटनांची मदत घेतल्याचा आरोप
या संघर्षाची ठिणगी काही दिवसांपूर्वीच पडली होती, जेव्हा सौदीने मुकल्ला बंदरावर हवाई हल्ला करून एका जहाजाला लक्ष्य केले होते. हे जहाज शस्त्रास्त्रांनी भरलेले असून ते UAE ने STC साठी पाठवल्याचा संशय सौदीला होता. दुसरीकडे, STC चे प्रवक्ते मोहम्मद अल नकिब यांनी सौदीवर गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, सौदी अरेबिया चक्क अल-कायदा आणि मुस्लिम ब्रदरहूड सारख्या दहशतवादी संघटनांची मदत घेऊन हल्ले करत आहे. या आरोप-प्रत्यारोपांमुळे दोन्ही देशांतील लष्करी संघर्ष आता उघड झाला आहे.
Saudi Arabia ?? royal air force’s airstrike wipes out the UAE ?? backed STC separatists in southern Yemen ?? Reports indicate that the STC commander Abu Ali Al Hadrami has fled Yemen as the internationally recognized gov’t forces moved in and to take control of the vacated… pic.twitter.com/LRF25d9s7H — Laascaanoodi (@north_somalia) January 2, 2026
तणाव शिगेला
राजकीय पातळीवरही हा वाद विकोपाला गेला असून, एडेन शहरात सौदीच्या शिष्टमंडळाचे विमान उतरू न दिल्याचा आरोप सौदीच्या राजदूतांनी STC वर केला आहे. हाद्रामौत भागातील STC चे प्रमुख मोहम्मद अब्दुलमलिक यांनी हवाई हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. मित्र राष्ट्र असलेल्या सौदी आणि UAE मधील हा अंतर्गत संघर्ष येमेनमध्ये मोठ्या मानवी संकटाला आणि दीर्घकालीन युद्धाला आमंत्रण देण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.
हेही वाचा – S Jaishankar: एस. जयशंकर यांचा जबरदस्त प्लॅन; पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून चिनाब नदीवर वीज प्रकल्प उभारणार