Sanju Samson ICC Award: संजू सॅमसनने पुन्हा रचला इतिहास; ICC च्या ‘या’ पुरस्कारावर कोरलं नाव

2026 च्या T20 विश्वचषकात टीम इंडियाला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या संजूच्या कौशल्याची ICC ने आता अधिकृतपणे दखल घेतली आहे.

Sanju Samson ICC Award: संजू सॅमसनने पुन्हा रचला इतिहास; ICC च्या ‘या’ पुरस्कारावर कोरलं नाव

Sanju Samson ICC Award: भारतीय क्रिकेटचा स्फोटक फलंदाज संजू सॅमसनची सनसनाटी कामगिरी अविरत सुरू आहे. 2026 च्या T20 विश्वचषकात टीम इंडियाला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या संजूच्या कौशल्याची ICC ने आता अधिकृतपणे दखल घेतली आहे. ICC ने संजू सॅमसनची मार्च महिन्यासाठी 'प्लेअर ऑफ द मंथ' (महिन्याचा सर्वोत्तम खेळाडू) म्हणून निवड केली आहे. या काळात त्याने सलग तीन सामन्यांमध्ये शानदार अर्धशतकी खेळी साकारून क्रिकेट जगतात खळबळ उडवून दिली आहे.

'प्लेइंग इलेव्हन'बाहेरून थेट जागतिक शिखरापर्यंतचा प्रवास
2026 च्या T20 विश्वचषकाची सुरुवात झाली तेव्हा संजू सॅमसन भारतीय संघाच्या 'प्लेइंग इलेव्हन'चा भाग नव्हता. मात्र, संधी मिळताच त्याने त्याचे सोने केले. सलामीवीर म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुरुवातीला त्याला फारशी छाप पाडता आली नाही, तरीही 1 मार्च रोजी वेस्ट इंडिजविरुद्धच्या 'नॉकआउट' सामन्यात त्याने आपला आक्रमक फॉर्म परत मिळवला. या सामन्यात त्याने 97 धावांची स्फोटक खेळी करत भारताचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.

मोठ्या सामन्यांचा मोठा खेळाडू: वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्ध तडाखा
संजूने महत्त्वाच्या सामन्यांमध्ये आपली सर्वोत्तम कामगिरी बाहेर काढली. वेस्ट इंडिजविरुद्ध 97 धावा केल्यानंतर, इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने 89 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यानंतर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात पुन्हा एकदा 89 धावा कुटत भारताला विश्वविजेते बनवण्यात मोलाचा वाटा उचलला. या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे तो खऱ्या अर्थाने 'मॅच विनर' ठरला आहे.

मार्च महिन्यातील आकडेवारी आणि ICC क्रमवारीतील झेप
केवळ मार्च महिन्यात फक्त 3 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना संजूने 275 धावांचा डोंगर उभा केला. त्याने 137.50 च्या सरासरीने आणि 199.27 च्या तुफानी 'स्ट्राइक रेट'ने या धावा जमवल्या. या कामगिरीच्या जोरावर त्याने सलग दोन वेळा 'सामनावीर' पुरस्कार पटकावला. तसेच ICC T20 क्रमवारीत मोठी झेप घेत थेट अव्वल 20 खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे. संजूला पहिल्यांदाच या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

हेही वाचा – Praful Hinge Followers: प्रफुल्ल हिंगेचा डबल धमाका! मैदानावर विक्रम, तर सोशल मीडियावर सहा हजारांवरून थेट 3 लाख फॉलोअर्स

ICC पुरस्कार मिळवणारा केरळचा पहिला क्रिकेटपटू
हा पुरस्कार जिंकून संजू सॅमसनने इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. ICC चा हा बहुमान पटकावणारा संजू सॅमसन हा केरळचा पहिला आणि एकमेव खेळाडू ठरला आहे. यापूर्वी अनेक भारतीय खेळाडूंनी हा पुरस्कार जिंकला असला, तरी केरळ राज्याला हा गौरव मिळवून देण्याची ही पहिलीच वेळ आहे. या यशासह संजूने केरळच्या क्रिकेट इतिहासात एका नव्या गौरवशाली अध्यायाची सुरुवात केली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number