भाजप नेते आणि केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. संजय राऊत यांनी राणे यांच्यावर टीका केल्यानंतर आज राणे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत हे शिवसेना संपावयला निघाले आहेत. संजय राऊत आजच्या राजकारणातील जोकर असून मातोश्रीला सुरुंग लावणारे विष आहे, ते एक विषारी प्राणी आहेत, अशी जहरी टीका राणेंनी केली. या संजय राऊतच्या मी काही गोष्टी उद्धव ठाकरे यांना सांगितल्या तर ते त्यांना चपलेने मारतील. मला रश्मी ठाकरे यांच्याबाबत काही गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. मी उद्धव ठाकरे यांना एक ना एक दिवस भेटून सांगणार आहे. त्यानंतर ते त्यांना चपलेने मारतील, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री राणे यांनी केले.
‘मला प्रोटेक्शन मी मागितलेलं नाही. ९० सालापासून आहे. मी ज्यांच्याबरोबर शिवसेनेत असताना लढलो त्यात देशातले नाही बाहेरचे लोक होते. पोलिसांनी त्यांना अटक केली. पोलिसांनी ९० साली जबरदस्ती सुरक्षा पुरवली. त्याला माहीत नाही. तो शिवसेनेत नव्हता.’ ‘शिवसेनेविरुद्ध तो लोकप्रभामध्ये लेख लिहित होता. तुम्हाला आज सांगतो. संजय राऊत तू जिथे बोलशील तिथे यायला तयार आहे. सुरक्षा मी इथेच सोडतो.’
‘हे राज्य शिवकल्याणकारी राज्य व्हावं या राज्यात येणारा उद्योगपती असो, नागरिक असो. या जनतेला सुखी-समाधानी करण्यासाठी आमचं सरकार एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे काम करत आहेत.’ ‘शिवसेनेचे आताचे नेते उद्धव ठाकरे असो, संजय राऊत.. कोणीही असो. काय लोकांच्या हिताचं बोलतात? अडीच वर्षात केलेलं काम त्यांनी सांगावं. कोणत्या क्षेत्रात काम केलं.. किती त्या राज्याचा जीडीपी वाढवला. दरडोई उत्पन्न वाढवलं.’
‘मला कळत नाही.. काय तुम्ही त्याला दाखवता. आजच्या राजकारणात हा जोकर आहे. जोकर. त्याच्याकडे काहीही बौद्धिकही नाही.’ ‘मी केंद्रीय मंत्री आहे.. मला काम आहे. माझा अंतर्गत ६ कोटी ३० लाख उद्योजक आहेत. मी अख्ख्या राज्यात फिरतो आणि उद्योग-रोजगार वाढवायचं काम करतो. हा उद्योग संजय राऊतला नाही.’