Parents Assistance Bill: आई-वडिलांना वाऱ्यावर सोडणाऱ्या मुलांचा कापला जाणार पगार; ‘या’ राज्यातील सरकारने लागू केला कठोर नियम

या नवीन कायद्यानुसार, जर मुलांनी आपल्या वृद्ध पालकांचा सांभाळ केला नाही किंवा त्यांना निराधार सोडले, तर सरकार थेट संबंधित मुलांच्या पगारातून ठराविक रक्कम कापून ती पालकांच्या खात्यात जमा करणार आहे.

Parents Assistance Bill: आई-वडिलांना वाऱ्यावर सोडणाऱ्या मुलांचा कापला जाणार पगार; ‘या’ राज्यातील सरकारने लागू केला कठोर नियम

Parents Assistance Bill: आधुनिक काळात वृद्ध आई-वडिलांकडे होणारे दुर्लक्ष आणि कौटुंबिक मूल्यांचा ऱ्हास थांबवण्यासाठी तेलंगणा सरकारने एक अत्यंत धाडसी आणि भावनिक पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने 'पालक सहाय्य विधेयक' (Parents' Assistance Bill) मंजूर केले आहे. या नवीन कायद्यानुसार, जर मुलांनी आपल्या वृद्ध पालकांचा सांभाळ केला नाही किंवा त्यांना निराधार सोडले, तर सरकार थेट संबंधित मुलांच्या पगारातून ठराविक रक्कम कापून ती पालकांच्या खात्यात जमा करणार आहे. वृद्धाश्रमांची वाढती संख्या आणि ज्येष्ठांचे हाल रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

पगार कपातीचे गणित आणि नियम
या कायद्यातील सर्वात महत्त्वाची तरतूद म्हणजे पगार कपातीची मर्यादा. जर एखाद्या पालकाने आपल्या मुलांविरुद्ध दुर्लक्षाची तक्रार केली आणि ती सिद्ध झाली, तर सरकार त्या कर्मचाऱ्याच्या मासिक पगारातून 15 टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त 10,000 रुपये (यापैकी जी रक्कम कमी असेल ती) कापून घेईल. ही कपात केलेली रक्कम दरमहा थेट पालकांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. यामुळे वृद्धांना कोणासमोरही हात पसरण्याची वेळ येणार नाही आणि त्यांना सन्मानाने जगता येईल.

सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
विशेष म्हणजे, हा कायदा केवळ सरकारी कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित नाही. तेलंगणा सरकारने याची व्याप्ती वाढवून खाजगी क्षेत्रातील कर्मचारी आणि अगदी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनाही या कक्षेत आणले आहे. पगारदार वर्गातील प्रत्येक व्यक्तीला आता आपल्या पालकांची जबाबदारी घ्यावीच लागेल. जर खासगी कंपनीतील कर्मचाऱ्याने नियमांचे उल्लंघन केले, तर सरकार संबंधित कंपनीला निर्देश देऊन पगार कपातीची अंमलबजावणी करण्यास भाग पाडेल. समाजातील प्रत्येक स्तरावर ज्येष्ठांचा आदर राखला जावा, हाच यामागचा मुख्य हेतू आहे.

हेही वाचा – FMCG Price Hike : आखाती तणावाचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर; आता बिस्किटे, चिप्स आणि शॅम्पू महागणार

केवळ दंड नाही, तर जबाबदारीची जाणीव
वृद्धांची काळजी घेणे ही केवळ नैतिक जबाबदारी नसून ती आता एक कायदेशीर कर्तव्य बनली आहे. अनेकदा मुले आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही पालकांना ओझे मानतात. अशा लोकांसाठी हा कायदा एक मोठा इशारा आहे. "वृद्धांचा सन्मान हा काही दानधर्म नाही, तर ती मुलांची मूलभूत जबाबदारी आहे," असे ठाम मत मंत्रिमंडळाने व्यक्त केले आहे. या विधेयकामुळे राज्यातील हजारो निराधार वृद्धांना मोठा आधार मिळणार असून, कौटुंबिक नात्यांमधील ओलावा टिकवण्यासाठी हा कायदा मैलाचा दगड ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number