जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी
शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमेच्या तीन दिवसीय उत्सवात साईबाबांच्या झोळीत भक्तांनी कोट्यवधींची गुरुदक्षिणा अर्पण केली.
साईचरणी तब्बल 5 कोटी 52 लाखांचं दान जमा झाले. दानपेटीत 3 कोटी रुपये आहेत. डोनेशन काऊंटवर 1 कोटी, तर चेक, डीडी आणि ऑनलाईन डोनेशनच्या
माध्यमातून 1 कोटीचं दान साईबाबांच्या झोळीत जमा झाले.
साईचरणी दान कोणकोणत्या स्वरुपात पडलं
– देणगी काऊंटरवर 1 कोटी 4 लाख 9 हजार रु
– हुंडीत 2 कोटी 94 लाख 3218 रुपये
– सव्वा दोन किलो सोन्याचं दान
– साडे आठ किलो चांदी
– 20 देशांचं 10 लाख रुपये किमतीच परकिय चलन
– 1920 साली सुरु झालेल्या साईसंस्थानच्या खात्यामध्ये 1600 रुपये होते.
– आज साई संस्थानकडे 1800 कोटी रुपये आहेत.
– यामध्ये 460 किलो सोनं 4500 किलो चांदीचा समावेश आहे.