Rohini Khadse : ‘अभिनंदन साहेब, तुम्ही करून दाखवलं!’; रोहिणी खडसे यांच्या कवितेने सरकारची कोंडी, नेमकं काय म्हणाल्या?

सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका विशेष कवितेच्या माध्यमातून रोहिणी खडसे यांनी 'अभिनंदन साहेब, तुम्ही करून दाखवलं' असे म्हणत सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर खोचक निशाणा साधला.

Rohini Khadse : ‘अभिनंदन साहेब, तुम्ही करून दाखवलं!’; रोहिणी खडसे यांच्या कवितेने सरकारची कोंडी, नेमकं काय म्हणाल्या?

Rohini Khadse on Farmers’ Suicide : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या गंभीर विषयाला हात घालत सरकारवर घणाघाती टीका केली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका विशेष कवितेच्या माध्यमातून त्यांनी ‘अभिनंदन साहेब, तुम्ही करून दाखवलं’ असे म्हणत सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर खोचक निशाणा साधला. शेतीमालाला मिळणारा अल्प दर, नापिकी आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला बळीराजा आज हतबल होऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याची दाहक वास्तवता त्यांनी आपल्या शब्दांतून मांडली. केवळ कागदी घोषणांमुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, तर प्रत्यक्ष जमिनीवर प्रभावी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे खडसे सांगत यांनी कवितेतून ताशेरे ओढले.

राजकीय खळबळ आणि शेतकऱ्यांच्या व्यथा
या कवितेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या असून, ग्रामीण भागातील अस्वस्थता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. पावसाची अनिश्चितता आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेती करणे दिवसेंदिवस कठीण होत असताना, सरकारच्या दुर्लक्षामुळे शेतकरी संकटात सापडल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. रोहिणी खडसे यांच्या या काव्यात्मक सवालामुळे सोशल मीडियावरही सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात असून, हा संवेदनशील विषय आता ऐरणीवर आला आहे. सत्तेच्या राजकारणात सामान्य शेतकऱ्यांच्या जगण्याचा प्रश्न बाजूला पडू नये, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.

हेही वाचा – Chhagan Bhujbal On PM Modi Statement : ‘एकदम पहिल्यासारखी परिस्थिती होणे कठीण’, छगन भुजबळ यांच इंधन तुटवड्यावर भाष्य

कविता – 

अभिनंदन साहेब तुम्ही हे करून दाखवलं
माझ्या आया बहिणींचा कुंकू तुम्ही पुसून दाखवलं

शेतकऱ्यांच्या घामाला आधी मातीमोल केलं
आणि त्याच्या आत्महत्येच्या शर्यतीत तुम्ही नंबर एकचं बक्षीस पटकावलं

कोण म्हणतं विकास झाला नाही
आता माझ्या शेतकऱ्याच्या बांधावरून हायवे गेले पण माझ्या शेतकऱ्यांना आता जमीनच राहिली नाही

आनंद साजरा करातुम्हाला झुकवणारा शेतकरी तुम्ही संपवला आहे
एक जाहिरात अशीही आता येऊ द्या महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांमध्ये पहिला 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number