IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाला घरच्या मैदानावर लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. गुवाहाटी कसोटीत भारताचा 408 धावांनी पराभव झाला आणि हा भारताचा घरच्या मैदानावरील सर्वात मोठा पराभव म्हणून नोंदला गेला. भारतीय फलंदाजांनी संपूर्ण मालिकेत अत्यंत खराब प्रदर्शन केल्याने चाहत्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली असून सोशल मीडियावरही टीकेची झोड उठली आहे. या तीव्र टीकेदरम्यान, गुवाहाटी कसोटीत कर्णधाराची जबाबदारी सांभाळणाऱ्या ऋषभ पंतने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत सर्वांची माफी मागितली. त्याने संघाच्या अपयशाची जबाबदारी स्वीकारत पुन्हा दमदार पुनरागमन करण्याचे आश्वासन दिले आहे.
हेही वाचा – WPL Auction 2026: महिला प्रीमियर लीगचा पहिला मेगा लिलाव कधी, कुठे आणि कसा पाहता येईल?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर पंतने म्हटलं आहे की, “या कसोटी मालिकेत आम्ही अजिबात चांगले खेळलो नाही हे मान्य करण्यात लाज नाही. एक संघ आणि खेळाडू म्हणून आम्ही सर्वोत्तम कामगिरी करायचा प्रयत्न केला, पण तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. भारतीय संघासाठी खेळणे हा आमच्यासाठी नेहमीच मोठा सन्मान आहे. या संघात मोठी क्षमता आहे, आणि आम्ही कठोर मेहनत करत लवकरच मजबूत पुनरागमन करू. तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.” पंतच्या या पोस्टनंतर अनेक चाहत्यांनी आणि क्रिकेटविशेषज्ञांनी त्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत मजबूत पुनरागमनाची अपेक्षा व्यक्त केली आहे.
?? pic.twitter.com/a5QjzCtY2a — Rishabh Pant (@RishabhPant17) November 27, 2025
हेही वाचा – Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जचा मोठा निर्णय! स्मृती मानधनाचे लग्न पुढे ढकलल्यानंतर WBBL मधून माघार
सर्वांच्या नजरा एकदिवसीय मालिकेकडे
दरम्यान, 25 वर्षांनंतर प्रथमच भारताला घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत क्लीन स्वीपचा सामना करावा लागला आहे. यामुळे येत्या 30 नोव्हेंबरपासून सुरू होणारी तीन सामन्यांची वनडे मालिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.