Flying Taxi: मुंबई-दिल्लीकरांची ट्रॅफिकमधून सुटका; ‘फ्लाइंग टॅक्सी’ने ताशी 322 किमी वेगाने होणार प्रवास

जागतिक स्तरावर या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानावर वेगाने काम सुरू असून, नुकतीच चीनमध्ये 10 प्रवाशांना वाहून नेण्यास सक्षम असलेल्या एका इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सीची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

Flying Taxi: मुंबई-दिल्लीकरांची ट्रॅफिकमधून सुटका; ‘फ्लाइंग टॅक्सी’ने ताशी 322 किमी वेगाने होणार प्रवास

Flying Taxi: भविष्यातील शहरी वाहतुकीचे स्वरूप बदलण्यासाठी आता "फ्लाइंग टॅक्सी" (उडणारी टॅक्सी) सज्ज झाली आहे. जागतिक स्तरावर या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानावर वेगाने काम सुरू असून, नुकतीच चीनमध्ये 10 प्रवाशांना वाहून नेण्यास सक्षम असलेल्या एका इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सीची यशस्वी चाचणी घेण्यात आली. V5000 असे या मॉडेलचे नाव असून, ती 5 टनांपर्यंत मालवाहतूक करण्यासही सक्षम आहे. या टॅक्सीच्या प्रवासी आवृत्तीला 'स्काय ड्रॅगन' तर मालवाहू आवृत्तीला 'मॅट्रिक्स' असे नाव देण्यात आले आहे.

धावपट्टीशिवाय उड्डाण आणि दीड हजार किमीची झेप
या फ्लाइंग टॅक्सीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचे 'व्हर्टिकल टेकऑफ अँड लँडिंग' (VTOL) तंत्रज्ञान. हेलिकॉप्टरप्रमाणेच ही टॅक्सी थेट वरच्या दिशेने झेप घेऊ शकते, त्यामुळे तिला विमानतळावरील धावपट्टीची गरज भासणार नाही. इमारतींचे छत किंवा लहान हेलिपॅडवरूनही ही टॅक्सी उडू शकणार आहे. हे हायब्रिड मॉडेल 1,500 किलोमीटर पर्यंतचे लांबचे अंतर सहज पार करू शकते, ज्यामुळे शहरांतर्गत प्रवासासोबतच आंतरशहर प्रवासासाठीही हा एक उत्तम पर्याय ठरणार आहे.

भारताची 'एअर टॅक्सी'साठी मोठी तयारी
भारतही या जागतिक स्पर्धेत मागे नसून स्वदेशी 'एअर टॅक्सी' विकसित करण्याच्या दिशेने वेगाने पावले टाकत आहे. IIT मद्रासच्या सहयोगाने विकसित करण्यात आलेल्या 'e-VTOL' विमानाचे प्रदर्शन नुकतेच 'India AI Impact Summit 2026' मध्ये करण्यात आले. विशेष म्हणजे, 2027 पर्यंत देशातील पहिली 'एअर ॲम्ब्युलन्स' सेवा सुरू करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखण्यात आली आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वाहतूक कोंडीतून वाचवून वेळेवर उपचार मिळणे शक्य होईल.

हेही वाचा – Audi SQ8 Booking: 500 हॉर्सपॉवरची ताकद अन् लक्झरीचा कमाल अनुभव; Audi SQ8 कारचे बुकिंग सुरू; पाहा या 'सुपर कार'चे खास फीचर्स

ताशी 322 किमी वेग; वाहतूक कोंडीतून कायमची सुटका
भारतातील दिल्ली-NCR, मुंबई आणि बंगळुरू यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये 2026 ते 2028 दरम्यान इलेक्ट्रिक एअर टॅक्सी सेवा प्रत्यक्ष सुरू होण्याची दाट शक्यता आहे. ताशी 322 किमी (200 मैल) या प्रचंड वेगाने धावणाऱ्या या टॅक्सीमुळे तासनतास चालणारा प्रवास अवघ्या काही मिनिटांत पूर्ण होईल. उदाहरणार्थ, गुरुग्राम ते जेवर विमानतळ हा प्रवास आता अत्यंत जलद होणार आहे. एकावेळी 10 प्रवाशांना घेऊन हवेतून प्रवास करणारी ही टॅक्सी महानगरांमधील वाहतूक कोंडीवर रामबाण उपाय ठरणार आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number