Ketan Agrawal Case: नकार देणारा किलर बनला सरकारी साक्षीदार; केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट

या धक्कादायक घटनेचा तपास करत असताना पोलिसांच्या हाती आता अत्यंत महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत.<br/>

Ketan Agrawal Case: नकार देणारा किलर बनला सरकारी साक्षीदार; केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट

Ketan Agrawal Case: पुण्यातील लोहगड येथे घडलेल्या केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. वडगाव मावळ न्यायालयाने दोघांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ केली आहे. काल (16 जुलै) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीत न्यायालयाने हा निर्णय दिला. या धक्कादायक घटनेचा तपास करत असताना पोलिसांच्या हाती आता अत्यंत महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत.

नकार देणारा कॉन्ट्रॅक्ट किलर बनला पोलिसांचा हुकमी एक्का
या संपूर्ण कटाचा पर्दाफाश करणारा एक महत्त्वाचा दुवा पोलिसांना सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतन यांनी सुरुवातीला केतनचा काटा काढण्यासाठी एका कॉन्ट्रॅक्ट किलरची मदत घेण्याचे ठरवले होते. एका कॅफेमध्ये या तिघांची बैठक झाली, जिथे त्याला हत्येची सुपारी देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. सुरुवातीला या कामाला होकार देणाऱ्या त्या व्यक्तीने केतनची माहिती मिळताच भीतीपोटी ऐनवेळी माघार घेतली. आता हीच व्यक्ती या खटल्यात सिया आणि चेतनविरोधातील सर्वात मुख्य आणि निर्णायक साक्षीदार ठरण्याची शक्यता आहे. पोलिसांनी संबधित कॅफेचे CCTV फुटेज आधीच जप्त केले असून, त्याद्वारे या गुप्त भेटीचा ठोस पुरावा न्यायालयात सादर केला जाणार आहे.

सुरुवातीला स्लो पॉइझनचा कट ठरला अपयशी
तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतन यांचे लग्न निश्चित झाल्यानंतर त्यांनी केतनला रस्त्यातून हटवण्याचे नियोजन सुरू केले. त्यांचा पहिला डाव केतनला 'स्लो पॉइझन' (हळूहळू असर करणारे विष) देऊन मारण्याचा किंवा त्याला कायमचे अपंग करण्याचा होता. यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले, परंतु बाजारातून योग्य ते विष न मिळाल्याने हा पहिला कट पूर्णपणे फसला. या अपयशानंतरच त्यांनी सुपारी देण्याचा आणि त्यानंतर थेट लोहगडावर नेऊन घातपात करण्याचा अंतिम कट रचल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी जपानी व्हिडिओचा आधार
लोहगडावर मार्च 2025 मध्ये एका 21 वर्षीय विधी शाखेच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता, ज्याची नोंद आत्महत्या म्हणून झाली होती. ही बातमी वाचल्यानंतरच सियाच्या डोक्यात केतनला तिथे संपवण्याची कल्पना आली. लोहगडावरील दुर्गम भाग, CCTV चा अभाव आणि सामान्य दिवसांमधील कमी गर्दी यामुळे तिथे प्रत्यक्षदर्शी मिळणे कठीध होते, हे ओळखूनच केतनला ट्रेकिंगच्या बहाण्याने तिथे नेण्यात आले.

हेही वाचा – Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगर हादरलं! खाकी वर्दीला डाग; 53 वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाकडून शिक्षिकेवर अत्याचार

याहून धक्कादायक बाब म्हणजे, अटकेनंतर पोलिसांच्या कडक चौकशीला कसे तोंड द्यायचे, याचे प्रशिक्षण या दोघांनी घेतले होते. यासाठी त्यांनी त्यांच्या मोबाईलवर तब्बल 2 तासांचा एक जपानी व्हिडिओ पाहिला होता. पोलिसांच्या प्रश्नांना उत्तर देताना शांत कसे राहायचे आणि गुन्ह्याची कबुली देणे कसे टाळायचे, याचे तंत्र या व्हिडिओत दाखवले होते. पोलिसांनी या दोन्ही आरोपींच्या इंटरनेट सर्च हिस्ट्रीमधून या 2 तासांच्या व्हिडिओच्या लिंक्स शोधून काढून त्या जप्त केल्या आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number