Fake Paneer : बनावट पनीर विक्रीस बंदी; महाराष्ट्राच्या आदेशाची केंद्राकडूनही होणार अंमलबजावणी

येत्या 1 मेपासून सर्व हॉटेल चालकांना त्यांच्या मेनू कार्डमध्ये महत्त्वाचे बदल करावे लागणार आहेत. जर एखाद्या डिशमध्ये खऱ्या पनीरऐवजी 'चीज अनॅलॉग' वापरले जात असेल, तर...

Fake Paneer : बनावट पनीर विक्रीस बंदी; महाराष्ट्राच्या आदेशाची केंद्राकडूनही होणार अंमलबजावणी

Artificial Paneer vs Real Paneer : हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये पनीर म्हणून ‘चीज अनॅलॉग’ (आर्टिफिशियल पनीर) विकणाऱ्यांविरुद्ध आता केंद्र सरकारने कडक पावले उचलली आहेत. महाराष्ट्र सरकारने यापूर्वी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आता देशभर करण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले आहेत. भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी विधिमंडळ अधिवेशनात हा गंभीर मुद्दा उपस्थित केला होता, ज्याची दखल घेत ‘एफएसएसएआय’ (FSSAI) ने आता कडक कारवाईसाठी परिपत्रक जारी केले आहे. या नवीन निर्णयामुळे हॉटेल, फास्ट फूड सेंटर्स आणि कॅटरर्सना आता ग्राहकांची दिशाभूल करता येणार नाही.

मेनू कार्डमध्ये बदल करणे अनिवार्य
येत्या 1 मेपासून सर्व हॉटेल चालकांना त्यांच्या मेनू कार्डमध्ये महत्त्वाचे बदल करावे लागणार आहेत. जर एखाद्या डिशमध्ये खऱ्या पनीरऐवजी ‘चीज अनॅलॉग’ वापरले जात असेल, तर तसा स्पष्ट उल्लेख मेनू कार्डवर करावा लागेल. केवळ पनीर लिहून कृत्रिम पनीरची विक्री केल्यास ग्राहकांची फसवणूक मानली जाईल. एफडीए (FDA) आणि एफएसएसएआय (FSSAI) कडून या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. हॉटेल व्यावसायिकांनी नियमांचे पालन न केल्यास त्यांचे परवाने देखील रद्द होऊ शकतात.

हेही वाचा – Auto-Cab Drivers New Rules: रिक्षा-टॅक्सी चालकांचा संपाचा इशारा, मात्र परिवहन खात्याने थेट नियमच बदलले, आता वाढलं टेन्शन

आरोग्यासाठी घातक: पनीर आणि चीज अनॅलॉग मधील फरक
पनीर आणि चीज अनॅलॉग दिसायला सारखे असले तरी त्यांच्या गुणधर्मात मोठी तफावत आहे. सामान्य नागरिकांना ओळखता यावे यासाठी काही महत्त्वाचे फरक जाणून घेऊ..
घटक: खरे पनीर केवळ दुधापासून बनवले जाते, तर चीज अनॅलॉगमध्ये पाम तेल, स्टार्च आणि मिल्क सॉलिड्सचा वापर होतो.
आरोग्य: पनीरमध्ये उच्च दर्जाचे प्रोटीन असते, तर कृत्रिम पनीरमध्ये अनहेल्दी फॅट्स आणि कोलेस्ट्रॉल वाढवणारे घटक असतात.
ओळख: खरे पनीर मऊ असते, तर चीज अनॅलॉग रबरासारखे चिवट आणि थोडे तेलकट असते.
किंमत: चीज अनॅलॉग सुमारे 150 ते 210 रुपये किलो मिळते, तर खऱ्या पनीरचा दर 350 ते 400 रुपये किलो इतका असतो.

ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ थांबणार
स्वस्त दरात मिळणारे कृत्रिम पनीर वापरून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचा आरोप आमदार पाचपुते यांनी केला होता. विशेषतः लहान मुलांच्या आहारात पनीरचा समावेश मोठ्या प्रमाणावर असतो, अशा वेळी वनस्पती तेल आणि दुधाच्या भुकटीपासून बनवलेले हे अनॅलॉग पचनाच्या तक्रारी आणि मेद वाढण्यास कारणीभूत ठरते. केंद्र सरकारच्या या आदेशामुळे आता हॉटेलमध्ये मिळणाऱ्या पदार्थांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल आणि ग्राहकांना आपण नेमके काय खातोय, याची खात्री मिळेल.

हेही वाचा – Shiv Ratan Agarwal Passes Away : बिकाजी फूड्सचे संस्थापक शिव रतन अग्रवाल यांचे निधन; उद्योग विश्वावर शोककळा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number