Dhurandhar 2 Trailer Released: रणवीर सिंग आणि अर्जुन रामपालचा अ‍ॅक्शन धमाका; ‘धुरंधर 2’ चा दमदार ट्रेलर प्रदर्शित, पाहा व्हिडीओ

जिओ स्टुडिओजने आपल्या यूट्यूब चॅनेलवर हा ट्रेलर लाँच केला असून, यामध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानातील कराचीमधील 'लियारी' या भागातील भयावह वास्तव मांडण्यात आले आहे.

Dhurandhar 2 Trailer Released: रणवीर सिंग आणि अर्जुन रामपालचा अ‍ॅक्शन धमाका; ‘धुरंधर 2’ चा दमदार ट्रेलर प्रदर्शित, पाहा व्हिडीओ

Dhurandhar 2 Trailer Released: जगभरात 1350 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या ‘धुरंधर’च्या ऐतिहासिक यशानंतर, निर्मात्यांनी या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा म्हणजेच ‘धुरंधर 2’ चा धडाकेबाज ट्रेलर प्रदर्शित केला आहे. जिओ स्टुडिओजने आपल्या यूट्यूब चॅनेलवर हा ट्रेलर लाँच केला असून, यामध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानातील कराचीमधील ‘लियारी’ या भागातील भयावह वास्तव मांडण्यात आले आहे. ट्रेलरमधील अ‍ॅक्शन आणि संवाद पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

रहमान डकेतच्या मृत्यूनंतर उजैर बलोचची एन्ट्री
ट्रेलरमध्ये दाखवण्यात आल्यानुसार, पहिल्या भागातील मुख्य खलनायक ‘रहमान डकेत’च्या मृत्यूनंतर लियारीमध्ये कमालीची अराजकता पसरली आहे. चहूबाजूंनी मृतदेहांचे ढीग साचलेले दिसत असून रक्ताने माखलेल्या रस्त्यांचे चित्रण अंगावर शहारे आणणारे आहे. या भागात आता उजैर बलोच या शक्तिशाली पात्राची एन्ट्री झाली असून, त्याच्या दहशतीची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. अर्जुन रामपालने साकारलेला ‘मेजर इक्बाल’ पुन्हा एकदा आपल्या निर्दयी अ‍ॅक्शनने पडदा गाजवताना दिसतोय, तर संजय दत्तने साकारलेली ‘अस्लम चौधरी’ ही व्यक्तिरेखा आपल्या खास शैलीतील संवादांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

पहिल्या भागाचा ऐतिहासिक विक्रम आणि पाकिस्तानातील क्रेझ
5 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ने केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावर बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडले होते. अक्षय खन्ना, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल यांच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. विशेष म्हणजे, पाकिस्तान आणि मध्य-पूर्व देशांमध्ये या चित्रपटावर बंदी असूनही, तिथे हा चित्रपट सर्वाधिक पायरेटेड ठरला. एका युट्यूबरने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानात हा चित्रपट अवघ्या 20 भारतीय रुपयांमध्ये बेकायदेशीरपणे उपलब्ध होता. यावरूनच या चित्रपटाच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो.

हेही वाचा – Vivek Oberoi: ‘विमानात प्रत्येक डोळ्यात भीती होती…’; दुबईत पोहोल्यानंतर विवेक ओबेरॉय याने शेअर केला व्हिडिओ

ओटीटीवरही ‘धुरंधर’चा डंका; 18 मार्चला होणार रिलीज
थिएटर्समधील यशानंतर ‘धुरंधर’ने नेटफ्लिक्ससारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही आपली ताकद दाखवली. आता, दुसऱ्या भागाचा ट्रेलर आल्याने चाहत्यांची प्रतीक्षा वाढली आहे. लियारीतील गुन्हेगारी विश्वाचा हा दुसरा अध्याय प्रेक्षकांना पुन्हा एकदा सिनेमॅटिक अनुभवाच्या सर्वोच्च शिखरावर नेण्यासाठी सज्ज आहे. हा चित्रपट 18 मार्च 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number