Raj Thackeray On Dhamendra : ‘गुंतागुंतीच्या जगातला हा एक सरळ माणूस…’, धर्मेंद्रजींच्या निधनानंतर राज ठाकरे भावूक

बॉलीवूडचे ही-मॅन धर्मेंद्र यांनी 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 'एक्स' पोस्ट शेअर करत धर्मेंद्र यांना खास श्रद्धांजली वाहिली आहे.

Raj Thackeray On Dhamendra : ‘गुंतागुंतीच्या जगातला हा एक सरळ माणूस…’, धर्मेंद्रजींच्या निधनानंतर राज ठाकरे भावूक

Raj Thackeray on Dharmendra : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे नोव्हेंबर 24 रोजी 89 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर केवळ मनोरंजनसृष्टीच नाही, तर राजकीय वर्तुळातूनही त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील धर्मेंद्र यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘धर्मेंद्रजींमध्ये असलेल्या अफाट क्षमतेचं…’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत धर्मेंद्र यांना खास श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी लिहिले आहे की, “ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्रजींचं निधन झालं. भारतीय सिनेमात ‘सुपरस्टार’ म्हटलं की त्याच्या झंझावाताचा एक काळ असतो आणि तो ओसरण्याचासुद्धा एक काळ असतो. पण, याला धर्मेंद्रजी अपवाद आहेत.”

बॉलिवूडमध्ये मनोरंजन सृष्टी समृद्ध करणाऱ्या महान कलाकारांच्या यादीत धर्मेंद्र (Dharmendra) यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ‘शोला और शबनम’, ‘शीशा और सुरत’, ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आणि हिंदी चित्रपटसृष्टीच्या (Hindi Film Industry) यशात मोलाची भर घातली. त्यांच्या मृत्यूनंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा – Dharmendra Untold Story : खरा सुपरहिरो! ‘या’ अभिनेत्याला गुंडांचा त्रास, धर्मेंद्र यांनी पुढे येऊन वाचवलं, नेमकं काय घडलं होतं?

राज ठाकरेंची ‘सुपरस्टार’वर खास पोस्ट
‘सरळ माणूस’ आणि ‘अफाट क्षमता’
राज ठाकरे यांनी पुढे नमूद केले की, “एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले, पण सुपरस्टारचं बिरुद त्यांना चिकटलं नाही म्हणा किंवा त्यांनी ते चिकटू दिलं नाही. मला चिकटू दिलं नाही असंच जास्त वाटतं. कारण – धर्मेंद्रजींच्या बाबतीत त्यांचं प्रतिमेहून प्रत्यक्ष उत्कट असं होतं.”

ते पुढे लिहितात, ‘1960 च्या दशकात धर्मेंद्र नावाचा एक देखणा, शरीराने अतिशय सुदृढ, मोहक हास्य, मर्दानीपणा सहज जाणवत असला तरी त्यात कुठेही दांडगाई नाही, अशा एका व्यक्तिमत्त्वाचा एक तरुण पडद्यावर झळकला आणि पुढे कित्येक दशकं त्याने हिंदी चित्रपटसृष्टीवर गारुड केलं.’

राज ठाकरे यांनी धर्मेंद्र यांच्या कारकिर्दीचा गौरव करताना म्हटले की, “करिअरच्या सुरुवातीलाच बिमल रॉय यांच्यासारख्या दिग्दर्शकांबरोबर (Director) काम करण्याचं भाग्य किती जणांच्या वाट्याला येतं? पुढे ऋषिकेश मुखर्जी, चेतन आनंद, रमेश सिप्पी, राज खोसला, मनमोहन देसाई यांच्यासारख्या अनेक दिग्दर्शकांना धर्मेंद्र आपला नायक (Hero) असावा असं वाटणं, यातच धर्मेंद्रजींच्यातल्या अफाट क्षमतेचं दर्शन होतं. सिनेमाच्या खूप गुंतागुंतीच्या जगातला हा एक सरळ माणूस होता आणि म्हणूनच सर्वसामान्यांनाही तो कायम आपला हिरो वाटत राहिला. त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन,” अशा शब्दांत राज ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टसोबत त्यांनी धर्मेंद्र यांचा एक फोटो (Photo) देखील शेअर केला आहे.

हेही वाचा – Dharmendra Passes Away: बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ धर्मेंद्र काळाच्या पडद्याआड; 89 वर्षी घेतला अखेरचा श्वास

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number