Dezeen Award 2025: भारतीय वास्तुकलेचा अभिमान! राज सभागृहाला मिळाला यंदाचा ‘सर्वोत्कृष्ट नागरी प्रकल्प’ पुरस्कार

सेरी आर्किटेक्ट्सने डिझाइन केलेले हे बहुउद्देशीय सभागृह यापूर्वीही आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झाले आहे.

Dezeen Award 2025: भारतीय वास्तुकलेचा अभिमान! राज सभागृहाला मिळाला यंदाचा ‘सर्वोत्कृष्ट नागरी प्रकल्प’ पुरस्कार

Dezeen Award 2025: श्री राजचंद्र मिशनच्या धरमपूर मुख्यालयातील भव्य राज सभागृहाने आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी कामगिरी बजावत देझीन आर्किटेक्चर अवॉर्ड 2025 मध्ये ‘सर्वोत्कृष्ट नागरी प्रकल्प’ (Urban Project) हा बहुमान पटकावला आहे. बेंटलेच्या भागीदारीत देझीन या जागतिक ख्यातीच्या वास्तुशास्त्रीय मासिकातर्फे हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला.

सेरी आर्किटेक्ट्सच्या डिझाइनला मोठी दाद

सेरी आर्किटेक्ट्सने डिझाइन केलेले हे बहुउद्देशीय सभागृह यापूर्वीही आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झाले आहे. आर्किटेक्चरल रिव्ह्यू मासिकाने याच इमारतीला 2022 मध्ये ‘एआर फ्यूचर प्रोजेक्ट- कल्चरल रीजनरेशन अवॉर्ड’ने गौरवले होते. पांढऱ्या संगमरवरी विटांनी सजवलेल्या राज सभागृहात ध्यान कक्ष, ग्रंथालय, बहुउद्देशीय सभागृहे, वर्गखोल्या, अभ्यागत सभागृह, भेट-अभिवादन क्षेत्र, श्रीमद् राजचंद्रांच्या जीवनाचे स्मरण करणारे संग्रहालय यांचा समावेश आहे. 

हेही वाचा – Parliament Winter Session 2025: हिवाळी अधिवेशनात मोदी सरकारकडून 14 विधेयकांची तयारी; काँग्रेससह विरोध पक्ष घेणार आक्रमक भूमिका

ही इमारत समकालीन आणि पारंपरिक वास्तुकलेचा सुंदर संगम म्हणून ओळखली जाते. श्रीमद् राजचंद्र, ज्यांच्या शिकवणींनी महात्मा गांधींनाही प्रेरणा दिली, त्यांचा आध्यात्मिक वारसा या स्थळातून प्रकट होत असल्याचही सांगण्यात येते.  

हेही वाचा – Railway Special Service: स्लीपर कोचमधील प्रवाशांसाठी रेल्वेची मोठी घोषणा! फक्त 20 ते 50 रुपयांमध्ये मिळणार बेडशीट आणि उशी

गुरुदेव राकेशजींच्या प्रेरणेने उभा राहिलेला प्रकल्प

श्री राजचंद्र मिशन धरमपूर (SRMD) ची स्थापना गुरुदेव राकेशजी यांनी केली असून त्यांनी 19व्या शतकातील जैन कवी-तत्त्वज्ञ श्रीमद् राजचंद्र यांच्या शिकवणींच्या प्रसाराला आपले आयुष्य अर्पण केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उभे राहिलेले राज सभागृह आज “आध्यात्मिक कल्याणाचे कायमस्वरूपी केंद्र” म्हणून गौरवले जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number