Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागाकडून पुढील 7 दिवसांसाठी हाय अलर्ट जारी

उत्तर भारतातील पर्वतीय क्षेत्रांपासून ते महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.<br/>

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागाकडून पुढील 7 दिवसांसाठी हाय अलर्ट जारी

Maharashtra Weather Update: देशातील हवामानाच्या स्थितीत मोठा बदल झाला असून येत्या सात दिवसांत देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) 30 जुलै ते 5 ऑगस्ट या कालावधीसाठी विशेष इशारा जारी केला आहे. उत्तर भारतातील पर्वतीय क्षेत्रांपासून ते महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.

वादळी वाऱ्यासह पाऊसाचा अंदाज 
महाराष्ट्राच्या दृष्टीने पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. हवामान खात्याच्या माहितीनुसार, 30 आणि 31 जुलै दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाच्या सरी कोसळू शकतात. याच काळात विदर्भातही विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. ऐन शेतीच्या हंगामात पावसाची ही तीव्रता पाहता, शेतकऱ्यांनी वीज पडण्याच्या धोक्यापासून वाचण्यासाठी झाडांचा आसरा घेणे टाळावे आणि आपल्या दैनंदिन शेतीकामांचे आधीच नियोजन करावे, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

हेही वाचा – Nanded Accident: नांदेडमध्ये विचित्र अपघात! अचानक जमीन खचली, कार थेट खड्ड्यात; चालकाचा जीव…

उत्तर भारतात हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्येही पुढील पाच ते सहा दिवस मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्याला हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी 'रेड अलर्ट' दिला आहे. जिल्ह्यात अनेक दिवसांपासून पावसाची जवळपास 29 टक्के तूट निर्माण झाली होती. मात्र काल सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली असून ही तूट भरून निघण्यास मदत होणार आहे.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number