Maharashtra Monsoon Update: राज्यात पुढील काही दिवस पावसाची विश्रांती; मुंबई-पुण्यासह कोकणात हलक्या सरी, इतर जिल्ह्यात काय परिस्थिती?

कोकण किनारपट्टीवरील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांत केवळ हलक्या सरींची शक्यता असून, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दक्षिण कोकणातील भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

Maharashtra Monsoon Update: राज्यात पुढील काही दिवस पावसाची विश्रांती; मुंबई-पुण्यासह कोकणात हलक्या सरी, इतर जिल्ह्यात काय परिस्थिती?

Maharashtra Monsoon Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पूर्णपणे ओसरून उघडीप दिली असून, अनेक भागांत उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) ताज्या अहवालानुसार, 13 जुलै रोजी राज्यातील बहुतांश प्रांतांमध्ये हवामान प्रामुख्याने शुष्क राहणार आहे. कोकण किनारपट्टीवरील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांत केवळ हलक्या सरींची शक्यता असून, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दक्षिण कोकणातील भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. 

मुंबईत कमाल तापमान 33 अंश तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवले जाईल. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगर वगळता धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्ये पावसाची शक्यता नाही. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या केवळ घाटमाथ्यावर किरकोळ सरी कोसळतील, तर सांगली आणि सोलापूरमध्ये पुढील 4 दिवस पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.

मराठवाडा आणि विदर्भात पावसाची प्रतीक्षा कायम 

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि धाराशिवसह सर्वच जिल्ह्यांमध्ये तूर्तास पावसाने ओढ दिली असून बळीराजा पुन्हा एकदा दमदार पावसाची वाट पाहत आहे. विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांतही सध्या कोरडे वातावरण असले, तरी स्थानिक पातळीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याने काही दिवसांत येथे पावसाचे पुनरागमन होऊ शकते. 

हेही वाचा – Devkund Waterfall Tragedy: प्रशासकीय बंदी झुगारणं जीवावर बेतलं; पुण्यातून रायगडला गेलेल्या 17 पर्यटकांपैकी दोघांना देवकुंड धबधब्यात जलसमाधी

प्रशांत महासागरात निर्माण झालेल्या एका शक्तिशाली चक्रीवादळाच्या प्रभावामुळे भारतातील मान्सूनची गती काहीशी मंदावली आहे. परिणामी, 12 ते 16 जुलै दरम्यान संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी राहील आणि पुढील 2 दिवस कोणत्याही जिल्ह्याला अलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र, 19 जुलै नंतर राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होऊन पावसाचा जोर वाढण्याची दाट शक्यता असल्याने, शेतकऱ्यांनी त्यानुसारच आपल्या शेतीकामांचे नियोजन करावे, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number