MSRTC Bus Cancelled: पावसामुळे ‘लालपरी’ला ब्रेक! 2 दिवसांत 7 हजारहून अधिक ST फेऱ्या रद्द; एका दिवसात 1.60 कोटींचे आर्थिक नुकसान

पावसचा जोर कायम असल्याने आज, सोमवारी देखील परिस्थिती आणखी बिकट झाली असून, आज तब्बल 4,219 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

MSRTC Bus Cancelled: पावसामुळे ‘लालपरी’ला ब्रेक! 2 दिवसांत 7 हजारहून अधिक ST फेऱ्या रद्द; एका दिवसात 1.60 कोटींचे आर्थिक नुकसान

MSRTC Bus Cancelled: महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्य परिवहन मंडळाच्या (ST) बस सेवेला मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टी आणि पूरसदृश परिस्थितीमुळे अनेक मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. रविवारी राज्यभरात एसटी महामंडळाच्या तब्बल 3,601 बस फेऱ्या रद्द कराव्या लागल्या होत्या. 

पावसचा जोर कायम असल्याने आज, सोमवारी देखील परिस्थिती आणखी बिकट झाली असून, आज तब्बल 4,219 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत असून अनेक भागांतील संपर्क तुटला आहे.

एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा आर्थिक तोटा
बस फेऱ्या मोठ्या प्रमाणावर रद्द झाल्यामुळे एसटी महामंडळाचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी एकाच दिवसात एसटी महामंडळाला 69.97 लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागले होते. 

हेही वाचा – Krishna River Water Level: संततधार पावसादरम्यान नृसिंहवाडीत भक्तीमय वातावरण; 'दक्षिणद्वार सोहळ्याची' भाविकांमध्ये उत्सुकता

दरम्यान, आज या नुकसानीमध्ये आणखी मोठी भर पडली असून, सोमवारी महामंडळाला तब्बल 1 कोटी 60 लाख रुपयांचा तोटा झाला आहे. लागोपाठ दोन दिवस झालेल्या या वाहतूक कोंडी आणि फेऱ्यांमधील कपातीमुळे महामंडळाच्या तिजोरीवर मोठा ताण पडला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number