KKR vs PBKS IPL 2026: ईडन गार्डन्सवर पावसाचा खेळ; कोलकाता-पंजाब सामन्यात व्यत्यय; सामना पुन्हा कधी सुरू होणार? वाचा

आज कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जात आहे. मात्र, या सामन्यात पावसाने खो घातला असून सध्या खेळ थांबवण्यात आला आहे.

KKR vs PBKS IPL 2026: ईडन गार्डन्सवर पावसाचा खेळ; कोलकाता-पंजाब सामन्यात व्यत्यय; सामना पुन्हा कधी सुरू होणार? वाचा

KKR vs PBKS IPL 2026: IPL 2026 चा 12 वा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जात आहे. मात्र, या सामन्यात पावसाने खो घातला असून सध्या खेळ थांबवण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढल्याने संपूर्ण मैदानावर 'कव्हर्स' (आच्छादने) टाकण्यात आली असून, क्रिकेटप्रेमी आता सामना पुन्हा सुरू होण्याची प्रतीक्षा करत आहेत.

पावसामुळे खेळ थांबला; खेळपट्टी आच्छादनाखाली
कोलकातामध्ये पावसाला सुरुवात झाल्याने पंचांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. पाऊस सुरू झाला तेव्हापर्यंत KKR ने 3.4 षटकांत 2 गड्यांच्या मोबदल्यात 25 धावा केल्या होत्या. सध्या ईडन गार्डन्सवर संततधार पाऊस सुरू असून मैदानाची खेळपट्टी आणि आजूबाजूचा परिसर पूर्णपणे झाकून टाकण्यात आला आहे. पाऊस थांबल्यानंतर मैदान सुकवण्यास किती वेळ लागेल, यावरच सामना पुन्हा सुरू होणे अवलंबून आहे.

मैदानावर काय सुरू आहे?
सुरुवातीला ईडन गार्डन्सवर पाऊस काही काळ थांबला होता आणि मैदान कर्मचाऱ्यांनी कव्हर्स हटवण्याचे काम सुरू केले होते. मात्र, दुर्दैवाने पुन्हा रिमझिम पावसाला सुरुवात झाली आणि कर्मचाऱ्यांना पुन्हा आच्छादने टाकावी लागली. पावसाच्या या लपंडावामुळे सामन्याला होणारा विलंब वाढत चालला असून षटकांची कपात होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

कोलकाताची फलंदाजी आणि धावसंख्या
सामना थांबला तेव्हा कोलकाताकडून कर्णधार अजिंक्य रहाणे (6 चेंडूंत 8 धावा) आणि अंगकृष रघुवंशी (7 चेंडूंत 7 धावा) हे फलंदाज क्रीजवर होते. तत्पूर्वी, अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सुरुवातीलाच कोलकाताने दोन महत्त्वाचे गडी गमावले आहेत. सध्या सामना पुन्हा कधी सुरू होईल, याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही.

हेही वाचा – Ishan Kishan Girlfriend: ‘फेमस होण्यासाठी अश्लील कपडे, छोट्या चित्रपटांत काम’… ईशान किशनच्या फॅन्सनी त्याच्या गर्लफ्रेंडचे जुने व्हिडिओ आणले समोर; अदिती हुंडिया होतेय प्रचंड ट्रोल

'प्लेइंग इलेव्हन'मध्ये मोठे बदल
या महत्त्वाच्या सामन्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या संघात दोन मोठे बदल केले आहेत. संघाचे मुख्य फिरकीपटू सुनील नरेन आणि वरूण चक्रवर्ती या सामन्यात खेळत नसल्याने चाहत्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यांच्या अनुपस्थितीत कोलकाताची गोलंदाजी कशी राहते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number