Simhastha Kumbh Mela 2027: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट; गर्दी नियंत्रणासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय

या नवीन 'मास्टरप्लॅन'नुसार केवळ नाशिक रोड स्थानकच नव्हे, तर परिसरातील उपनगरांमधील स्थानकांचाही विकास केला जाणार आहे.

Simhastha Kumbh Mela 2027: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट; गर्दी नियंत्रणासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय

Simhastha Kumbh Mela 2027: आगामी 2027 मधील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक प्रशासन आतापासूनच सज्ज होत आहे. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने आपल्या पायाभूत सुविधांमध्ये क्रांतीकारी बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग यांनी नुकताच रेल्वे कामांचा सविस्तर आढावा घेतला. या नवीन 'मास्टरप्लॅन'नुसार केवळ नाशिक रोड स्थानकच नव्हे, तर परिसरातील उपनगरांमधील स्थानकांचाही विकास केला जाणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्लॅटफॉर्मचा विस्तार करणे आणि स्थानकांवर चेंगराचेंगरी टाळण्यासाठी विशेष 'होल्डिंग एरिया' (प्रतीक्षा कक्ष) उभारण्यावर प्रामुख्याने भर दिला जाणार आहे.

उपनगरातील स्थानकांचे रूप पालटणार
केवळ मुख्य स्थानकावर ताण येऊ नये म्हणून प्रशासनाने पर्यायी स्थानकांच्या सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित केले आहे. आयुक्त शेखर सिंग यांनी बुधवारी प्रत्यक्ष भेट देऊन कसबे सुकेणे, खेरवाडी, ओढा आणि देवळाली या रेल्वे स्थानकांची पाहणी केली. या स्थानकांवर प्रवाशांची हाताळणी करण्याची क्षमता किती आहे आणि तिथे तातडीने कोणत्या नवीन सोयी-सुविधांची गरज आहे, याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. कुंभमेळ्याच्या काळात भाविकांच्या सोयीसाठी अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना या उपनगरीय स्थानकांवर अतिरिक्त थांबे देण्याचेही नियोजन आहे.

स्वच्छता आणि आरोग्य सुविधांना प्राधान्य
गर्दी व्यवस्थापनासोबतच भाविकांच्या आरोग्याची आणि मूलभूत गरजांची काळजी घेण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. स्थानक परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी अतिरिक्त जलकुंभ आणि नळ जोडणी केली जाणार आहे. तसेच, स्वच्छता राखण्यासाठी आधुनिक शौचालयांची उभारणी, कचरा व्यवस्थापन प्रणाली आणि स्वतंत्र स्वच्छता पथकांची तैनात करण्यात येणार आहे. यामुळे देशभरातून येणाऱ्या भाविकांना एक स्वच्छ आणि सुखकर प्रवासाचा अनुभव मिळू शकेल.

हेही वाचा – Parth Pawar: सस्पेन्स संपला! पार्थ पवारांनी उघड केलं सत्य; पटेल-तटकरे यांच्यावरच्या आरोपांवर दिलं उत्तर

यंत्रणांमधील समन्वय आणि सुरक्षितता
या पाहणी दौऱ्यावेळी देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर एन. आर. पांडे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आयुक्त शेखर सिंग यांनी स्पष्ट केले की, स्थानिक गरजा ओळखून सर्व सरकारी यंत्रणांमध्ये समन्वय राखणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. कुंभमेळ्यात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सुरक्षित आणि दर्जेदार प्रवासाचा अनुभव देण्यासाठी प्रशासन वचनबद्ध आहे. रेल्वेच्या या मास्टरप्लॅनमुळे नाशिकमधील रेल्वे स्थानके अधिक 'हायटेक' होणार असून, गर्दीच्या वेळी होणारे धोके टाळण्यासाठी आतापासूनच ठोस पावले उचलली जात आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number