नॅशनल हेराल्ड मनी लॉड्रींग प्रकरणी सोमवार ते बुधवार सलग तीन दिवस राहुल गांधींची ईडीकडून चौकशी करण्यात आली. तिन्ही दिवस अनुक्रमे ८.३० तास, ११.३० तास आणि १० तास चौकशी झाली. आता पुन्हा त्यांना आज चौकशीसाठी बोलावण्यात आलंय. सोनिया गांधी यांची रुग्णालयात देखभाल करण्यासाठी राहुल यांनी मुदतवाढ मागितली आहे. ती आता मान्य करण्यात आली आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची सध्या तब्येत बरी नाही. त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. सोनिया यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. सोनिया यांच्या उपचाराचं कारण सांगत राहुल गांधींनी ईडी अधिकाऱ्यांना शुक्रवारी चौकशीसाठी हजर राहता येणार नाही, असं पत्राद्वारे सांगितलं आहे. त्यामुळे ईडी अधिकाऱ्यांनी शुक्रवारी चौकशीसाठी मुभा द्यावी, अशी विनंती राहुल गांधी यांनी केली होती.
काँग्रेसने १९३८ मध्ये असोसिएट जर्नल्स लिमिटेडची स्थापना केली. असोसिएट जर्नल्स लिमिटेड अंतर्गत नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र आहे. असोसिएट जर्नल्स लिमिटेडवर ९० कोटींहून अधिक कर्ज घेतले. ९० कोटी कर्ज फेडण्यासाठी यंग इंडिया लिमिटेड कंपनीची स्थापना केली. यंग इंडिया लिमिटेडमध्ये राहुल, सोनियांची हिस्सेदारी ३८-३८ टक्के आहे. एजेएलचे ९ कोटी शेअर्स यंग इंडियाला दिले. शेअर्सच्या बदल्यात यंग इंडिया एजेएलचं कर्ज फेडणार आहे. देशातील मोक्याच्या जागांवर कमी किंमतीत ऑफिससाठी जागा आहे.