Radha Patil On Gautami: ‘हीचं वागणं म्हणजे मी नाही त्यातली अन् कडी….’; राधा पाटीलचे गौतमीवर गंभीर आरोपांची सरबत्ती

गौतमी पाटील आणि राधा पाटील यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आतापर्यंत शांतता राखणाऱ्या राधा पाटीलने एका मुलाखतीत गौतमीबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

Radha Patil On Gautami: ‘हीचं वागणं म्हणजे मी नाही त्यातली अन् कडी….’; राधा पाटीलचे गौतमीवर गंभीर आरोपांची सरबत्ती

Radha Patil On Gautami: महाराष्ट्रात लोकनृत्याच्या कार्यक्रमांमध्ये कायम चर्चेत असलेल्या गौतमी पाटील आणि राधा पाटील यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आतापर्यंत शांतता राखणाऱ्या राधा पाटीलने एका मुलाखतीत गौतमीबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले असून तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सांगलीतील कार्यक्रमातून पेटला वाद

राधा पाटीलने दिलेल्या माहितीनुसार, सांगलीतील एका कार्यक्रमात गौतमी आणि राधा दोघींनाही नृत्य सादर करण्यासाठी बोलावण्यात आले होते. गौतमी पाटील संध्याकाळी 7 वाजता पोहोचली होती. तर राधा 8.30 वाजता कार्यक्रमस्थळी आली. राधा पोहोचताच शो सुरू झाला आणि यामुळे गौतमीचा पारा चढल्याचे राधाने सांगितले. राधा म्हणाली, “मी परफॉर्मन्स सुरू केला आणि प्रेक्षक माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी करत होते. हे पाहिल्यानंतर गौतमी तिथून अचानक निघून गेली. तिच्या ग्रुपमधील लोकांनीच मला सांगितलं की ती माझ्यावर नाराज झाली आहे.”

हेही वाचा – Dhurandhar Movie Update : 'धुरंधर'समोर मोठा पेच! प्रदर्शनाच्या तोंडावर दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल, शहीद मेजरच्या कुटुंबीयांची काय आहे मागणी?

गौतमीने माझ्या लेव्हलवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले

राधा पुढे म्हणाली, “शोदरम्यान गौतमी म्हणाली, मी या मुलीसोबत स्टेज शेअर करणार नाही, तिची लेव्हल काय? तेव्हा मला जाणवलं की तिच्यात अॅटीट्यूड किती आहे.”दोघींच्या व्हॅनिटी वॅन्स एकमेकांच्या शेजारी होत्या. त्या वेळीदेखील गौतमीने आयोजकांशी राधाविषयी नाराजी व्यक्त केल्याचा दावा राधाने केला. “ती स्वतःला कोण समजते? महाराष्ट्राची राणी आहे का?” असा सवाल राधाने उपस्थित केला.

तिचं सार्वजनिक वागणं एक, आणि कलाकारांशी वागणं अगदी वेगळं 

राधा पाटीलचा आरोप आहे की, “गौतमी पाटील लोकांमध्ये नम्रपणे वागते, पण कलाकारांशी मात्र उद्धटपणे. गौतमीचं वागणं मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली असं आहे. मी त्या प्रवृत्तीची नाही.” तिने हेही म्हटले की एका विवादात तिला गौतमीला पाठिंबा द्यायचा होता, पण गौतमी लोकांची ‘लायकी काढण्यात’ गुंतलेली असल्याने तिला कोण पाठिंबा देईल, असा प्रश्नही राधाने उपस्थित केला.

हेही वाचा – Rohit Raut: मराठमोळ्या गायकाची कमाल! रोहित राऊत झाला I-Popstar शोचा विजेता; बक्षीसाची रक्कम वाचून थक्क व्हाल

ट्रॉली शोबाबत गंभीर आरोप

राधा पाटीलने गौतमीवर काही गंभीर आरोपही केले “ट्रॉली शो, असभ्य नृत्य, असे अनेक प्रकार गौतमीने केले. आम्ही कधीही असे प्रकार केले नाहीत.” ट्रॉली शो म्हणजे ट्रॅक्टरवर कार्पेट टाकून त्यावर नाच सादर करण्याची पद्धत. “हा प्रकार अतिशय अशोभनीय आहे. माझ्या कारकीर्दीत मी कधीही असे काम केले नाही.” मीडियाबाबत राधाने गौतमीवर आणखी आरोप केले. मी पैसे देऊन मीडियाला बोलावत नाही. माझा कार्यक्रम असेल तर मीडियावाले स्वतः येतात. मी बाईट देण्यासाठी उगाच कॅमेऱ्यांच्या मागे पळत नाही, असंही राधाने म्हटलं आहे. गौतमी आणि राधा यांच्यातील स्पर्धा आणि मतभेद बऱ्याच काळापासून चर्चेत आहेत. नवीन आरोपांमुळे या वादाची ठिणगी पुन्हा पेटली आहे.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number