Quetta Rally Blast in Pakistan: पाकिस्तानच्या नैऋत्य बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा येथे मंगळवारी संध्याकाळी झालेल्या भीषण स्फोटात किमान 14 जण ठार झाले, तर 35 जण जखमी झाले. मंगळवारी संध्याकाळी शाहवानी स्टेडियमजवळ हा स्फोट झाला. ज्येष्ठ बलुचिस्तान नेते सरदार अत्ताउल्लाह मेंगल यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रम संपल्यानंतर काही क्षणांतच हा स्फोट झाला.
आरोग्यमंत्री बख्त मुहम्मद काकर यांनी मृतांचा आकडा जाहीर करताना सांगितले की जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांच्या मते, प्राथमिक तपासात हा हल्ला बीएनपी प्रमुख अख्तर मेंगल यांच्या ताफ्यावर असल्याचे दिसून येते, मात्र मेंगल यांना इजा झाली नाही. बीएनपी प्रवक्ते साजिद तारीन यांनी पुष्टी केली की स्फोटात पक्षाचे 13 सदस्य ठार झाले. अख्तर मेंगल यांचे वाहन तेथून जाताच स्फोट झाला, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा – Donald trump औषधांवर 200 टक्के Tariff लादण्याच्या तयारीत; अमेरिकन लोकच अडचणीत येणार?
अख्तर मेंगल यांनी एक्लवरून आपल्या सुरक्षिततेची माहिती दिली आणि कार्यकर्त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, आमच्या कार्यकर्त्यांचे बलिदान कधीही विसरले जाणार नाही. अल्लाह त्यांना जन्नत देवो आणि कुटुंबीयांना धीर देवो.
Thank you for your prayers and messages. Alhumdulillah I am safe, but deeply heartbroken at the loss of our workers. Around 15 have been martyred and many injured. They stood by me and gave their lives for our cause. Their sacrifice will never be forgotten. May Allah grant them… — Akhtar Mengal (@sakhtarmengal) September 2, 2025
दरम्यान, बलुचिस्तानचे मुख्यमंत्री मीर सरफराज बुगती यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. त्यांनी म्हटले की, ‘हा हिंसाचार प्रदेशात भीती आणि अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.’ बुगती यांनी जखमींना तातडीने वैद्यकीय सेवा पुरवण्याचे आदेश दिले तसेच सखोल चौकशीसाठी विशेष समिती स्थापन केली आहे. तथापी, स्फोटानंतर क्वेटामध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.